tikli on forhead
|

कपाळावर टिकली लावल्याने जाणवू शकतात, त्वचेचे विकार

हॅलो आरोग्य  ऑनलाईन । हिंदू धर्मात आपल्याकडे टिकली लावण्याच्या प्रथेला जास्त महत्व दिले जाते. सर्रास स्त्रिया सगळीकडे आपल्या कपाळाला टिकली लावतात . टिकली जर लावली गेली नाही तर,  मात्र धर्मात अशुभ मानले जाते. त्यामुळे सर्व स्त्रियांच्या कपाळावर कुंकू किंवा टिकली दिसते . अनेक वेळा आजकालच्या तरुण मुली या टिकली लावणे टाळतात कारण आपल्या कपाळावर टिकलीचे किंवा कुंकवाचे डाग तसेच राहतात. आणि त्यापासून ऍलर्जी निर्माण होऊ शकते. त्वचेचे विकार टाळण्यासाठी सुद्धा आपल्या कपाळावर टिकली लावली नाही गेली तरी चालू शकते.कपाळावर टिकली लावली कि त्या ठिकाणी खाज सुटायला सुरुवात होते होते. त्यामुळे कपाळावर ऍलर्जी  होते. अश्या वेळी त्वचा हि खूप खराब दिसते. त्यावेळी काय घरगुती उपाय करू शकतो ? ते जाणून घेऊया …

तिळाच्या तेलाचा करा वापर —

ज्यावेळी कपाळावर कुंकू किंवा टिकली लावली जाते. त्यावेळी तो डाग तसाच कपाळावर उठून दिसतो अश्या वेळी त्यावर तिळाच्या तेलाचा वापर केला तर मात्र आपल्या कपाळावरील डाग हा काही प्रमाणात कमी कमी होऊ शकतो. ज्यावेळी आपण कपाळावर टिकली लावतो अश्या वेळी टिकलीच्या चिकटली जावी म्हणून त्यावेळी गम सारख्या रासायनिक पदार्थाचा वापर हा जास्त केला जातो. त्यामुळे त्या केमिकल चा आपल्या त्वचेशी संपर्क येत त्या भागावर जखमा यायला सुरुवात होते. त्यावेळी तिळाचे तेल फार फायदेशीर ठरते .

कडुलिंबाचे तेल लावा —

कडुलिंबाच्या पानाबरोबर कडुलिंबाच्या तेलाचा सुद्धा वापर हा केला जाऊ शकतो. कडुलिंबाचे तेल हे आपल्या त्वचेला  फार गुणकारी आहे. त्वचेच्या कोणत्याही भागावर खाज असल्यास त्या जागी कडुलिंबाचे तेल लावावे. त्यानंतर टिकली लावलीय तरी चालू शकते.

कापूर आणि नारळाचे तेल ——-

कापूर आणि नारळाचे तेल हे आपल्या आरोग्याला हे फार फायदेशीर असते. नारळाचे तेल जसे आपल्या केसांसाठी लाभकारक आहे . तसेच त्याचा वापर हा आपल्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी सुद्धा केला जाऊ शकतो.

जास्त गम असलेली टिकली लावू नका —

जर जास्त गम असलेली टिकली लावली तर मात्र आपल्या त्वचेला खाज हि जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकते. जर गोंद असलेली टिकली कपाळावर लावली तर मात्र त्रास हा जास्त निर्माण होऊ शकतो.

टिकली पेक्षा कपाळाला कुंकू लावावे —-

कूंकुवामध्ये जास्त प्रमाणात रासायनिक पदार्थाचा समावेश असेल तर मात्र कपाळावर त्याचा वापर हा जास्त करू नये. पण टिकलीपेक्षा कुंकवाचा वापर हा जास्त प्रमाणात केला गेला पाहिजे.