कमी वेळात चमकदार त्वचेसाठी रोज रात्री वापरा बदामाचे तेल
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात बदाम हा असला पाहिजे. कारण बदामाच्या मदतीने आपल्या बुद्धीला तसेच आपल्या चेहऱ्याला सुद्धा खूप फायदा होतो. बदाम हे आपल्या मेंदूसाठी खूप गुणकारी आहे. बदामाच्या तेलाचा वापर हा आपल्या चेहऱ्यावर केल्याने त्याचे कोणते कोणते असे फायदे होतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात …
— रोज रात्री चेहऱ्याला बदामाचे तेल लावल्यामुळे त्वचा अधिक चांगली आणि सुंदर राहण्यास मदत मिळते.
— बदामाच्या तेलाने त्वचेचा पोत सुधारतो.
— बदामाचे तेल हे व्हिटॅमिन इ ने युक्त असते. त्वचेत हे तेल मुरल्यानंतर त्वचा आतून अधिक चांगली होण्यास मदत मिळते.
— रुक्ष आणि खरबरीत त्वचेसाठी बदामाचे तेल लाभकारी आहे.
— त्वचा उजळण्यास मदत
— पिंपल्सचे डाग करते कमी करते. त्यामुळे तुमचे सौदर्य हे अजून उजळून दिसते.
— रोज रात्री बदामाचे तेल चेहऱ्याला लावा.
— डोळ्यांखालील काळी वर्तुळं करते कमी
— जर केसांच्या समस्या मुळे आपली स्किन हि खराब दिसत असेल तर त्यावेळी बदाम तेलाचं वापर करावा .
— बदामाच्या तेलाने मसाज करा.