थंड पाणी आरोग्यासाठी योग्य कि अयोग्य ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या शरीरात जवळपास ७० टक्के हे पाणीच असते. आपले निम्याहून सारे शरीर हे पाण्याने भरलेले असते. आयुर्वेदानुसार आपल्या आहारात पाण्याला खूप महत्व आहे. प्रत्येकाच्या वयानुसार शरीरात दररोज किती प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे हे आयुर्वेदात सांगितले गेले आहे. आपल्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी पाणी आवश्यक आहे. तसेच आपल्या शरीरात निर्माण झालेले वेस्टेज मटेरिअल बाहेर टाकण्यासाठी पाणी हे मदत करते. पण त्यासाठी थंड पाणी पिणे या गरजेचे आहे कि नाही ते माहिती करून घेऊया …
आयुर्वेदानुसार आपल्या शरीराचे अंतर्गत तापमान ९८ डिग्री सेल्सियस असते. दिवसांत जर योग्य प्रमाणात पाणी पिले गेले तर मात्र आपल्या शरीराला इतर पोषक द्रव्ये शोषण्यासाठी आवश्यक असलेले तापमान संतुलित राहण्यास मदत होऊ होऊ शकते. जेव्हा आपण गार पाणी पिता तेव्हा पाण्याचे तापमान वाढवण्यासाठी आपल्या शरीराला अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे शक्यतो थंड पाणी पिणे टाळले गेले पाहिजे. पण कधी कधी गरम पाणी पिण्याची जास्त इच्छा निर्माण होत नाही. त्यावेळी आपल्या आजूबाजूच्या तापमानानुसार पाणी पिणे योग्य राहील म्हणजे त्यामुळे पचन क्रिया दुरुस्त ठेवण्यास योग्य ठरेल.
कोमट पाणी पिण्याचे फायदे—-
अनेक वेळा डॉक्टर सल्ले देतात कि , तुमच्या आहारात कोमट पाण्याचा समावेश असला पाहिजे. गरम पाण्यापेक्षा कोमट पाणी हे आरोग्यास लाभकारक असते. थंड पाणी रक्तवाहिन्या प्रतिबंधित करतं आणि अशात आपलं शरीर अन्नामधून सर्व पोषक आणि जीवनसत्त्वे आत्मसात करण्यास सक्षम नसतं. कोमट पाणी पचन प्रक्रियेला गती देतं आणि हे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी देखील योग्य आहे. गार पाण्यामुळे फॅट्स गळत नाही आणि हळू-हळू लठ्ठपणा वाढत राहतो. साधारण वेगळ्या आजारांना समोरे जावे लागत असेल तर त्यावेळी मात्र आपल्या आहारात गरम पाण्याबरोबर कोमट पाण्याचा सुद्धा समावेश असणे आवश्यक आहे.