Why is it right to brush your teeth every day?
|

दररोज दात घासणे का आहे योग्य?

हॅलो आरोग्य ऑनलाईन।  आपल्या आरोग्यसाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी दात घासावेच लागतात. दात जर घासणे नाही तर तोंडाच्या समस्या या काही प्रमाणात निर्माण होतात. त्यामुळे आपल्याला फ्रेश सुद्धा वाटत नाही. दात न घासल्याने आरोग्याच्या समस्या या जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकतात. दात जर तुमचे स्वच्छ नसतील तर तुमच्या व्यक्तीमहत्वात खूप फरक जाणवतो. त्यामुळे दात का घासले जावेत ते जाणून घेऊया …

दातांच्या फटीत अन्नकण अडकून व दातांवर अन्नाचा सूक्ष्म थर जमून जंतूंची वाढ होते. त्यामुळे दात लवकर किडतात. जंतूंमुळे तोंडाला दुर्गंधी येते आणि हिरडया सुजतात. हे टाळण्यासाठी प्रत्येक जेवणानंतर खळखळून चूळ भरावी. याचबरोबर दात, हिरडया चोळून धुणे आवश्यक असते. सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना दात साफ करणे आवश्यक आहे. दात घासण्यासाठी फक्त ब्रश किंवा दातवण काडी पुरते. टूथपेस्टची उपयुक्तता मर्यादित आहे. पेस्ट नसल्यास नुसता ब्रश पण वापरू शकतोगोड चवीच्या टूथपेस्टपेक्षा कडू, तुरट, तिखट, खारट चवीची मंजने दातावरचे चिकट आवरण सहज काढतात. यासाठी साधी राख किंवा कोळशाची पूडही चालते.दातांच्या फटी साफ करण्यासाठी मात्र ब्रश किंवा दातवण लागते. बाभूळ, कडूनिंब यांच्या काडया दातवणासाठी सर्रास वापरल्या जातात. ही चांगली पध्दत आहे.

मिश्रीने मात्र दातावर किटण चढते. आरोग्याच्या दृष्टीने मिश्रीचा वापर चुकीचा आहे. ब्रश वापरण्याची पध्दत महत्त्वाची आहे. ब्रश आडवा न चालवता ‘खाली-वर’ फिरवला पाहिजे म्हणजे फटी स्वच्छ होतील.हिरडया बोटाने चोळणेही दात घासण्याइतकेच महत्त्वाचे आहे. हिरडया चोळण्याने तिथला रक्तप्रवाह सुधारतो.