neckpain

अवघडलेल्या मानदुखी च्या आजाराविषयी…..

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  अनेक वेळा आपण जास्त वेळा काम करत बसल्यानंतर मात्र आपल्याला मान दुखीच्या समस्या या जास्त प्रमाणात जाणवायला सुरुवात होते. कधी कधी मान झोपेत असताना सुद्धा अवघडली जाऊ शकते. मान अवघडल्यामुळे मानेच्या समस्या या जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकतात. मानेमुळे इकडे तिकडे हलवणे सुद्धा अवघड बनत जाते. मान दुखण्याची पण कारणे हि वेगवेगळी आहेत, कोणती ती जाणून घेऊया ……

अनेक वेळा सतत काम करत राहिल्याने आपल्या शरीराची झीज होते आणि त्यामुळे मान दुखीच्या समस्या या निर्माण होऊ शकतात. त्यालाच सरवायकल स्पाँडीलायसिस असे नाव आहे . सतत एकाच स्थितीत बसून राहिल्याने किंवा शांत झोप न लागण्याने अश्या समस्या या निर्माण होऊ शकतात. त्यात आपल्या दररोज च्या जीवनात कमी प्रमाणात व्यायामाचा अभाव हे सुद्धा यासाठी कारणीभूत आहे. आजकाल लोकांचा मोबाइल वापरण्याचे प्रमाण हे जास्त वाढले आहे. त्यामुळे सतत आपली नजर हि मोबाइल वर असल्याने सुद्धा या समस्या निर्माण होऊ शकतात.

दररोज च्या कामकाजाच्या व्यतिरिक्तकाही वेळ हा व्यायामासाठी दिला गेला पाहिजे. काही व्यायाम आपण नित्य नियमाने केले तर मानेच्या समस्या या निर्माण होणार नाहीत. बाल आसन, नटराज आसन , .मार्जरिआसन , उत्थिता त्रिकोन मुद्रा , शवासन असे योगाचे आणि व्यायामाचे प्रकार केल्यानंतर आपल्याला खूप लाभ होतात.