अचानक सुन्न पडलेल्या पायासाठी घरगुती उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन । अचानक कधी कधी आपले पाय खाली टेकवावेसे वाटत नाहीत. पाय एकदम सुन्न होतो त्याला कोणत्याच प्रकारच्या वेदना समजल्या जात नाहीत. साधारण जास्त वेळ पायाची हालचाल न झाल्याने पाय अकडतात . त्यामुळे पाय हे अतिशय सुन्न हे होत जातात. त्यालाच मराठीमध्ये मुंग्या येणे असे म्हंटले जाते. सुरुवातीला साधारण समस्या वाटली तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. कोणते घरगुती उपाय हे करू शकता ते जाणून घेऊया ….
— पायाला मुंग्या आल्यानंतर काही प्रमाणात हळद वाटीत घ्या . त्यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी ओता आणि ती पेस्ट आपल्या मुंग्या आलेल्या भागाला लावा. किंवा थोड्या प्रमाणात मालिश करा. त्यामुळे मुंग्या येणे बंद होईल.
— जर सतत मुंग्या या येत असतील तर त्यावेळी आपल्या आहारात रात्री झोपताना एक ग्लास दूध घ्या. त्यामध्ये एक चमचा मध, आणि एक चमचा हळद याचा वापर हा झोपताना करा. काही दिवसात तुमच्या पायाला मुंग्या येण्याचे प्रमाण हे कमी होत जाईल.
— एका भांड्यात गरम पाणी करून घ्या त्याच्यामध्ये काही प्रमाणात मिठाचा वापर हा करावा. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काही खडे हे मिठाचे टाकले जावेत त्यामुळे पायांतील रक्तपरिसंचयन हे नीट होण्यास मदत होते.