शरीरातील ऑक्सिजन क्षमता माहिती असणे गरजेचे आहे का ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या शरीरात जसे पाण्याची आवश्यकता जास्त असते. तसेच आपल्या शरीराला ऑक्सिजन ची पण आवश्यता हि अधिक असते. जर आपल्या शरीरात योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळाला नाही तर मात्र आपल्याला अनेक प्रकारचा त्रास हा निर्माण होऊ शकतो. ऑक्सिजन योग्य असणे हे निरोगी शरीराची लक्षणे आहेत, जाणून घेऊया ऑक्सिजन मोजण्यासाठी यंत्र वापरावे कि नको ?
पल्स ऑक्सिमेट्री ही एक सोपी आणि वेदनारहित अशी टेस्ट असते. ही टेस्ट तुमच्या शरिरातली ऑक्सिजन चेक करण्याचे काम करते. हे मशीन तुमच्या रक्तातील ऑक्सिजन मोजण्याचे काम करत असते. या टेस्टने तुमच्या शरिरातील ऑक्सिजनशी संबंधित लहानसहान बदल लगेच कळत असतात. पल्स ऑक्सिमीटर हे एक चिमट्याच्या आकाराचे यंत्र आहे. हे यंत्र बोटांना किंवा कानाच्या पाळीला सहज लावता येऊ शकते. बऱ्याचवेळा हे इमर्जन्सी रूम्समध्ये वापरले जाते. अनेक ठिकाणी डॉक्टर सुद्धा याचा वापर करतात.
याचा वापर हा आपल्या शरीरात फुफुसाची औषधे कशा प्रकारे काम करत आहेत हे तपासण्यासाठी केला जातो. कोणाला श्वासाची गरज आहे का त्यावेळी सुद्धा या मशीन चा वापर केला जातो. एखादा रुग्ण हा व्हेंटिलेटर वर असतो त्यावेळी सुद्धा त्याच्या शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण माहित करून घेण्यासाठी या मशीन चा वापर केला जातो. रुग्णाच्या शरीरासाठी व्हेंटिलेटर किती लाभकारक आहे ते पाहण्यासाठी सुद्धा याचा वापर हा केला जातो.रुग्णासाठी पूरक ऑक्सिजन लावणे किती प्रभावी ठरू शकेल याचा अंदाज बांधण्यासाठी. आणि रुग्ण आपल्या शरीरात नव्याने निर्माण झालेले बदल हे स्वीकारू शकेल का याची तपासणी करण्यासाठी याचा वापर हा केला जाऊ शकतो.