केसांना फाटे फुटण्याची काय आहेत कारणे ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । अनेक वेळा मुलीच्या केसांना फाटे फुटले असल्याचे असल्याचे आपण पहिले असतील. फाटे फुटल्याने अनेक वेळा आपला चेहरा हा कुरूप दिसायला सुरुवात होते. त्यामुळे त्यामुळेकेसांचे केसांचे सौदर्य हे बिघडत जाते. त्यावर अनेक उपाय सुद्धा उपलब्ध आहेत, पण त्यापूर्वी त्याची कारणे काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात ….
केसांना फाटे फुटणं अर्थात स्प्लिट एंड्स हेअर म्हणजे केस खालून दोन भागात विभागले जातात. त्यामुळे केस वाढीला संकट निर्माण होते. केस वाढत असताना त्याच्यामध्ये एका ठराविक वाढीनंतर तेच केस पुढे दोन केसांमध्ये रूपांतर होते. केस खूप लांब झाले तर केसांच्या खालच्या बाजूला त्याचे तुरे दिसायला लागतात त्यामुळे केसांच्या समस्या या जास्त निर्माण होतात. त्यामुळे केसांचे सौदर्य सुद्धा कमी कमी होत जाते . त्याच्यावर एकमेव उपाय म्हणजे त्या वेळी केसांना कापणे किंवा स्ट्रीम देणे हेच उपाय सांगितले जातात. पण सतत पार्लर मध्ये जाऊन केसांना कमी करणे किंवा वाफ देणे हे परवडण्यासारखे अजिबात नाही.
कारणे —
— तुमच्या केसांना अतिप्रमाणात जर तुम्ही केमिकल चा वापर करत असाल तर त्यावेळी सुद्धा केसांना फाटे फुटतात. अनेक वेळा मुली आपले केस हे कुरळे आहेत म्हणून ते केस स्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतात . अश्या वेळी केमिकल चा वापर आणि त्यानंतर ज्या पद्धतीने काळजी घेणे गरजेचे असते . तशी काळजी घेतली गेली नसेल तर सुद्धा आपल्या केसांना फाटे फुटतात. अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट या आपल्या केसांसाठी केल्या जातात. त्यामुळे सुद्धा आपले केस हे खराब दिसायला सुरुवात होते.
केसांना तेल न लावणं —
आपल्या शरीराच्या पोषणासाठी ज्याप्रमाणे पाणी आणि आहाराची गरज असते. त्याचप्रमाणे आपल्या केसांच्या पोषणासाठी तेलाची आवश्यकता असते. तेल जर नाही लावले गेले तर मात्र आपले केस हे केसांसाठी तेल हे अतिशय आवश्यक असतं. वेळोवेळी जर केसांना तेल लावलं नाही तर त्यामुळे केस कोरडे पडतात आणि त्यामधील चमकदारपणा निघून जातो. यामुळेच केसांना फाटे फुटायलाही सुरुवात होते. आठवड्यातून किमान दोन वेळा केस धुण्यापूर्वी एक तास केसांना तेल लावून ठेवा आणि केसांना चांगलं पोषण द्या. तर तुमच्या केसांची समस्या नक्की दूर होईल.
जास्त वेळा केस धुणं —
ज्यावेळी तुम्ही तुमच्या केसांना तेल न लावता धुता त्यावेळी केसांच्या समस्या या निर्माण होतात. केस पातळ होण्याच्या समस्या या जास्त जाणवतात. सतत केस धूत राहिल्याने तुमच्या केसांची चमक हि निघून जाते. त्याच्यामध्ये असलेले तेल सुद्धा निघून जाते. रोजच शाम्पू चा वापर करत असू तर ते सुद्धा आपल्या केसांसाठी अजिबात योग्य नाही.
सतत एकाच शाम्पू चा वापर करणे —
अनेक वेळा महिला या एकच शाम्पू वापरतात. तो शाम्पू वापरला कि त्यामुळे आपले केस हे सुंदर आहेत असे वाटते . पण सतत एकाच प्रकारच्या शाम्पू चा वापर केल्याने आपले केस हे रुक्ष होण्यास सुरुवात होते. केसांना एकाच प्रकारच्या शाम्पूची सवय असल्याने इतर शाम्पू वापरणे फार अवघड वाटते. इतर शाम्पू हा सूट होत नाही.