हिवाळ्यात गुळाचा चहा पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात सकाळच्या वेळेत आपण चहा हा घेतोस त्याशिवाय आपल्या नव्या दिवसाची सुरुवात हि झाली असे वाटत नाही आणि कोणतेच काम तेवढ्या उत्साहाने करायला पाहिजे तेवढ्या उत्साहाने केले जात नाही. . प्रत्येक जण सकाळच्या वेळेत चहा घेतोच . पण त्याचे स्वरूप हे मात्र वेगवेगळे असते. कोणाचा ग्रीन टी असतो. कोणाचा कॉफी तर कोणी ब्लॅक टी घेण्याचा प्रयत्न करत असते. अश्या वेळी आपल्या आहारात साखरेच्या चहाचा समावेश करण्यापेक्षा गुळाच्या चहा आपल्यासाठी फार लाभकारक आहे . का ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात .
ज्यावेळी तुम्ही आजारी पडता अश्या वेळी तुम्हाला तुमचे डॉक्टर हे शेंगदाणे आणि गूळ खाण्याचा सल्ला देतात. कारण गुळामध्ये खूप सारे औषधी गुणधर्म आहेत. त्याचा फायदा हा आपल्या शरीराला होत असतो. गुळामध्ये जास्त प्रमाणात मॅग्नेशियम कोलिन , बीटेन , फॉस्फरस , बी ६ असे सगळे गुणधर्म हे गुळामध्ये असतात. नैसर्गिक रित्या गूळ हा साखरेला सर्वात चांगला असा पर्याय आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त समस्या या निर्माण होणार नाहीत. हिवाळ्याच्या दिवसांत तर तुमच्या आहारात काही ना काही प्रमाणात गुळाचा समावेश हा केलाच जावा. ज्या लोकांना श्वासाचा त्रास हा जास्त आहे . त्या लोकांनी आपल्या आहारात गुळाचा समावेश हा केला जावा. गूळ हे तुमचा आहार वाढण्यास सुद्धा मदत करते . गूळ आणि तीळ एकत्र करून खाल्ले असता तुम्हाला श्वासाच्या समस्या या काही प्रमाणात कमी कमी होऊ शकतात.
प्रत्येक महिन्याला मुलींना येणाऱ्या पाळीच्या समस्या या कमी करण्यासाठी गुळाचा प्रभाव हा जास्त असतो. गूळ हा नैसर्गिक रित्या उपयोगी असल्याने त्याच्यामुळे पाळीच्या काळातील वेदना सुद्धा दूर केल्या जातात. तसेच आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन चे प्रमाण जर कमी असेल तर त्यावेळी शेंगदाणा आणि गूळ एकत्र करून खाल्ले जाते. सकाळच्या वेळेत आल्याबरोबर जर तुम्ही गूळ घेतला तर सांधेदुखीच्या समस्या या कमी प्रमाणात निर्माण होऊ शकतात.