पाय दुखत असतील तर घरगुती उपाय जाणून घेऊया
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या दररोजच्या कामकाजामुळे अनेक वेळा आपल्याला नेहमीच्या पद्धतीने व्यायाम करता येत नाही . अश्या वेळी कधी कधी खूप कामाचा लोड असेल तर त्यावेळी किंवा अशक्तपणा आला असेल तर त्यावेळी आपल्या पायांच्या वेदना या वाढायला सुरुवात होते. त्यासाठी आहारात काय काय घेतले जावे ते जाणून घेऊया …
दूध प्या—
आपल्या आहारात जर दुधाचा समावेश केल्याने आपल्या शरीराला कॅल्शियम चा पुरवठा या योग्य प्रमाणात होतो. त्यामुळे आपल्या शरीराला ड जीवनस्तव मिळण्यास मदत होते. लहानपणापासून जर मुले भरपूर दूध पीत असतील तर त्यांची हाडे मजबूत होतात आणि पाय दुखत नाहीत. दररोज एक कप दूध पिल्याने सुद्धा आपल्याला थकवा जाणवत नाही.
व्यायाम आणि खेळ—
मैदानी खेळ हे आपल्या दररोज च्या दिनक्रमात असला पाहिजे. मैदानावरील खेळांनी, नियमित व्यायामाने हाडांचा कणखरपणा वाढतो. शाळा – कॉलेजच्या दिवसात रोज खेळणे शक्य असते त्यानंतर नोकरी – धंद्यामुळे जर वेळ मिळत नसेल तर आठवड्यातून दोनदा तरी खेळावे. त्यामुळे शरीराला लवचिकता मिळण्यास मदत होते.
धूम्रपान सोडा —
आपल्या दिनक्रमात ध्रुम्रपान आणि तंबाखू याचा समावेश केल्याने आपल्याला रोग किंवा इतर आजार होण्याची शक्यता असते. पण त्याचा वापर जर जास्त प्रमाणात झाला तर मात्र रक्तवाहिन्या आकुंचन होतात. त्यामुळे पायांच्या समस्या या जास्त प्रमाणात जाणवतात. जर अशक्तपणा आला असेल तर त्यावेळी थोडे जरी चालले तरी पाय आणि पोटऱ्या कमालीच्या दुखतात.
वजन कमी करा —
आपले पूर्ण वजन आपल्या पायांवर पेलले जाते. त्यामुळे वजन वाढले की गुडघे, घोटे आणि टाचा दुखू लागतात. वजन जास्त असणे पायांना सहन होत नाही. त्यामुळे पाय हे जास्त दुखतात.
आहार —
आहारात योग्य पदार्थांचा समावेश केला तर मात्र पायांचे दुखणे काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकतो. शाकाहारामध्ये सीताफळ, दूध, दही, पनीर, तर मांसाहारात मासे, मटण, अंड्यातील पिवळा बलक, कॉडलिव्हर ऑईल यातून कॅलशियम आणि ड जीवनसत्व मिळते. त्यामुळे पायांच्या समस्या या कमी प्रमाणात जाणवू शकतात.