आपल्या शरीरासाठी या गोष्टी मात्र टाळायलाच हव्यात
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्याला जर योग्य प्रकारच्या सवयी असतील तर त्या सवयी या आपल्या शरीराला अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत करतात . अनेक वेळा आपल्या चुकीच्या सवयी या आपल्या शरीरासाठी त्रासदायक ठरतात. अनेक वेळा वाईट गोष्टींची सवय हि आपल्याला लवकर लागते , पण त्याचा वाईट गोष्टीला दूर करण्यसाठी खूप प्रयत्न करावे लागतात. वाईट सवयी सोडा आणि आरोग्य सांभाळा असा मंत्र जो आहे तो अतिशय योग्य असाच आहे . त्यामुळे काही गोष्टी टाळण्याचा प्रयत्न हा केला जावा.
— अती तिखट तेलकट, तळकट मसालेदार आहार करु नका.
— सतत खाण्याची सवय असेल तर दूर करा. सतत खात बसू नका.
— कडक कॉफी- कडक चहा व चहा- कॉफीचे अतिरेकी सेवन टाळावे.
— कोरा चहा घेत जा. अनोश्यापोटी चहा घेणे टाळा.
— अती गोड रात्रीच्या वेळी खाणे टाळा. त्यामुळे दातांच्या समस्या या जास्त जाणवू लागतील .
— रात्री शक्यतो दूध आईस्क्रीम खाऊच नये.
—- संध्याकाळी साधारण थोडेच जेवा .
— उघड्यावरचे तसेच हॉटेलमधील पदार्थ टाळा.
— कोणतेच औषध स्वतःहून घेऊ नका .
— काही काळ पुरेशी झोप घ्या. त्याने शरीराला आराम मिळतो.
वाईट सवयीचे होणारे दुष्परिणाम—
— जन्मभरासाठी पचनविकृती येते.
— आतड्याचे कर्करोग होण्याची संभावना वाढते.
— आपल्याला ठराविक काळानंतर त्रास जाणवायला सुरुवात होते.
— नैराश्य जास्त प्रमाणात जाणवते.
— शरीराचे मोठे मोठे विकार जडायला सुरुवात होते.