फक्त पाळी चुकली म्हणजे गरोदर आहात असं आहे का?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवसानंतर महिलांना मासिक पाळी येतेच . त्या काळात महिलांना ताण हा जास्त जाणवतो. महिला ज्यावेळी गरोदर राहतात. त्यावेळी फक्त मासिक पाळी नाही आली म्हणून ती महिला गरोदर असू शकते असं काही नाही. कधी कधी शरीरात झालेल्या बदलामुळे मासिक पाळीच्या समस्या या जास्त जाणवतात. कधी लवकर येते तर कधी लेट येते . मासिक पाली हि लेट होण्याची कारणे हि वेगवेगळी आहेत . मासिक पाळी न येणे म्हणजे ती स्त्री गरोदर आहे , असे तर्क वितर्क लावले जातात. मासिक पाळी न येणे म्हणजे गरोदर असण्याबरोबर अजून वेगवेगळी लक्षणे आहेत , कि त्यामुळे महिला गरोदर आहे. हे लक्षात येते .
लक्षणे —
— सुरुवातीच्या काळात शरीराला खूप थकवा हा जाणवतो.
— अशक्तपणा हा जास्त जाणवायला सुरुवात होते .
— — काही काळानंतर महिलांची मासिक पाळी हि मिस होते .
— स्त्रियांच्य स्तनाना दुखरे वाटणे .
— डोकेदुखी वाटणे , तणाव जास्त असल्यासारखे वाटणे .
— सकाळी उठल्या उठल्या शरीराचे तापमान हे जास्त वाढते . हे तापमान जर दररोज दोन आठवडे तसेच राहिले तर मात्र गरोदर असल्याचे लक्षात येते .
— सतत लघवीला जाण्यास लागते .
— ऍसिडिटी चा त्रास हा जास्त वाटतो.
— मळमळ झाल्यासारखे जाणवते .
— गॅस च्या समस्या वाढतात . त्यामुळे कोणतेच पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होत नाही.
— सतत आजारी पडणे .
— महिलांचे मूड हे बदलत राहतात .
— सर्दी किंवा फ्लू ची लक्षणे जाणवतात .
— उलट्या होतात.