अंजीर आणि दूध सोबत घेण्याचे फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात अनेक वेळा वेगवेगळ्या फळांचा वापर हा केला जातो. फळे हि आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाची आहेत . ड्राय फ्रुटस हे आपल्याला प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते . अंजीरचे असणारे फायदे हे अन्यनसाधारण असेच आहेत . अंजीर हे कॅल्शियम , पोटॅशियम आणि मॅग्नेशियम याचा सर्वात महत्वाचा आणि उत्तम असा स्रोत आहे.
अनेक स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात खूप वेदना होतात. आहारात जर अंजीराचा समावेश केला तर त्यामुळे वेदना तर दूर होतात . तसेच शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. कारण त्याच्यामध्ये लोहाचे प्रमाण हे जास्त असते . लोहामुळे शरीरातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढते . त्यामुळे महिलांना कोणत्याही समस्या या उध्दभवत नाहीत .आणि अशक्तपणा सुद्धा दूर होण्यास मदत होते .
अंजिरामध्ये फायबर चे प्रमाण हे जास्त असते . त्यामुळे पचनाच्या समस्या या दूर होतात. तसेच त्याच्यामध्ये असलेले पेक्टिन नावाचा घटक हा शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते . चयापचनाच्या समस्या या दूर होण्यासाठी दररोज तीन ते चार अंजिरे हे पाण्यात भिजवा आणि ते दररोज संध्याकाळी दुधासोबत घ्या . त्याने पचनशक्ती वाढते .
दिवसभरात ऊर्जा हि खूप लागते. वेगवेगळ्या कामांसाठी ऊर्जा हि जास्त खर्च होते . अश्या वेळी ऊर्जा हि योग्य प्रमाणात राखून ठेवण्यासाठी अंजीर फायदेशीर आहे . पुरुषांच्या आहारात तर दररोज संध्याकाळी अंजीर ठेवावे . म्हणजे त्याने योनशक्ती वाढण्यास पुरुषांना मदत होते . आपल्या शरीराला असणाऱ्या उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या काही समस्या असतील तर त्या समस्या दूर होण्यासाठी अंजीर आहारात खावे .