जेवण केल्यावर पोट फुगीच्या समस्या वाढत असल्यास …….
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात जर जड पदार्थाचा समावेश झाला तर मात्र पोटाच्या समस्या या जास्त जाणवतात . पोटदुखीचा सुद्धा त्रास हा तितकाच जाणवायला सुरुवात होते . अनेक वेळा जेवण केले तर लगेच पोटाच्या समस्या या जाणवायला लागतात. वेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश झाला तर सुद्धा पोट फुगीच्या समस्या या जाणवतात. आहारात गोड पदार्थ ठेवू नयेत . म्हणजे हा त्रास जास्त जाणवणार नाही. आपल्या आहारात द्रव्य पदार्थाचा वापर हा जास्त केला पाहिजे. म्हणजे अपचनाच्या समस्या या वाढणार नाहीत.
आपल्या आहारामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असलेले अन्नपदार्थ समाविष्ट करा. पोटॅशियम मुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त ‘फ्लुइड्स’ किंवा द्रव बाहेर पडून पोटफुगी कमी होते. म्हणून आपल्या आहारामध्ये केळी, रताळी, पालक, पिस्ते अश्या पदार्थांचा समावेश आवर्जून करायला हवा. तसेच फळे सुद्धा असणे गरजेचे आहे. सकाळच्या वेळी दररोज काही प्रमाणात नाश्ता करणे आवश्यक आहे .त्यामुळे सकाळी फायबर युक्त पदार्थांचा आपल्या नाश्त्यामध्ये समावेश करावा. फायबर युक्त पदार्थांच्या सेवनाने पोट पुष्कळ वेळ भरलेले राहते, त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये आपोआपच अन्न सेवन मर्यादित राहते. एखाद्या मेजवानीला जाण्यापूर्वी देखील फायबर युक्त पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे आपोआप भूक कमी लागेल आणि मेजवानीतील तेलकट, मसालेदार, पचण्यास जड पदार्थांवर ताव मारण्याचा मोह आवरता येणे शक्य होईल.
आपल्या आहारामध्ये फायबर युक्त पदार्थांच्या सेवनासोबतच भरपूर पाणी पिणे देखील समाविष्ट करावे. तसेच आपल्या आहारातील मिठाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवावे. मिठाच्या अतिसेवनाने शरीरामध्ये फ्लुईड्स साठत राहतात. परिणामी पोट फुगू लागते. पाणी पिताना एकाच वेळी जास्त पाणी पिणे टाळावे. पाणी पिताना थोडे थोडे पाणी दिवसातून अनेकदा प्यावे. शारीरिक हालचाल सुद्धा काही प्रमाणात असणे आवश्यक आहे . शारीरिक हालचाल नसल्याने सुद्धा पोट फुगीच्या समस्या या निर्माण होतात. जर जास्त खाण्यामुळे गॅसेस किंवा अपचन झाले तरी पोट फुगु लागते. अश्या वेळी पुदिन्याची पाने घालून केलेला काढा किंवा चहा पोटफुगी कमी करण्यास मदत करतो. या चहामध्ये साखर घालू नये.