नस दाबली गेली असल्यास घरगुती पद्धतीचे उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन । अनेक वेळा आपल्या शरीराच्या काही ना काही समस्या या वाढू शकतात. अश्या वेळी जर तुम्ही घरगुती उपचारांचा वापर केला तर त्यावेळी मात्र आपल्याला नस च्या काही समस्या असतील तर त्या दूर होतील. नस दाबली गेली असल्यास घरगुती उपाय अवलंबवा. त्यामुळे आपल्याला त्रास कमी होणार आहे . कधी कधी चुकून नसांमध्ये वेदना या जास्त होतात. परंतु कधी कधी शरीराच्या मज्जातंतूंवर दाब पडल्याने आपल्या वेदना या असह्य होतात. अश्या वेळी नसांच्या वेदनेला दुर्लक्षित जर केले तर त्यावेळी ते धोकादायक असू शकते . जाणून घेऊया कश्या पद्धतीने आपण घरगुती उपाय करू शकतो ते जाणून घेऊया …
मॉलिश करू शकता—-
सहज रित्या दाबलेल्या हाताच्या किंवा पायाच्या नसेवर काही प्रमाणात तेलाच्या साहयाने मालिश करा. साध्या किंवा सौम्य कोमट नारळाच्या तेलाने त्यावर मालिश केली तर मात्र इतर समस्या या जास्त जाणवणार नाहीत . तसेच या वेदनेपासून काही प्रमाणात तरी आराम मिळेल. आणि नस बरी होईल .
शेकावे—–
नसाची सूज कमी करण्यासाठी बर्फ किंवा गरम पाण्याने शेकावे. वेदनेच्या क्षेत्राला किमान १५ मिनिटे दिवसातून ३ वेळा शेकावे. या मुळे सूज कमी होईल आणि वेदनेपासून मुक्ती मिळेल.
मीठ —
सूती कपड्यात सेंधव मीठ घाला. एक बादलीत गरम पाणी घेऊन त्यामध्ये सेंधव मिठाची कापड घाला आणि या पाण्याने अंघोळ करा किंवा 30 मिनिटे त्यामध्ये बसावे. या मुळे नसांचे दुखणे कमी होईल.
पुरेशी झोप घ्या—-
आपल्या दुखनेला कमी करण्यासाठी काही प्रमाणात बाम लावून शांत झोप घ्या. विश्राती केल्यानंतर काही वेळ आराम मिळण्यास मदत होऊ शकते .
स्ट्रेचिंग —
काही प्रमाणात हाताचे व्यायाम करा . त्यामुळे नस हि जास्त दुखणार नाही .