जेवताना सतत पाणी का पिले जावू नये ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात पाणी असणे आवश्यक आहे . पण जेवण केल्यानंतर सुद्धा जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात पाणी पीत असाल तर ते आपल्या शरीराला फार हानिकारक आहे . तसेच जेवताना सुद्धा पाण्याचा वापर हा जास्त केला जाऊ नये . कारण त्यामुळे आपले पोटभरून जेवण होत नाही . पोटात जास्त प्रमाणात पाणीच असते .त्यामुळे जेवढा आहार जाणे आवश्यक आहे . तेवढा आहार शरीरात जात नाही. जेवण झाल्या झाल्या कधी सुद्धा आहारात पाणी घेऊ नये . त्याची कारणे जाणून घेऊया ….
पाचक प्रणाली योग्यरीत्या काम करत नाही—–
जेवण केल्यानंतर लगेच आहारात पाणी घेऊ नये . कारण त्यामुळे तुमची पाचक प्रणाली हि योग्य रित्या काम करत नाही . अनेक समस्यांना सामोरे जायला लागते .
— शरीराचे तापमान बदलते
जेवणानंतर ताबडतोब पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान बदलू शकते. या मुळे अन्न पचनासाठी लागणाऱ्या तापमानात देखील बदल होऊ शकतो. त्यामुळे शरीराचे तापमान समतोल राहण्यासाठी आहारात पाणी योग्य प्रमाणातच घेतले गेले पाहिजे .
— रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते
जेवणानंतर पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते. या मुळे मधुमेहाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे ज्या लोकांना मधुमेह आहे त्या लोकांनी तर आपल्या आहारात जेवण झाल्या झाल्या अजिबात पाणी घेऊ नये . जेवण केल्यानंतर ठराविक वेळेनंतर पाणी घायला काहीच हरकत नाही .
— गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो
आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता हि जास्त असते . अश्या वेळी जर पाणी नाही घेतलं तर अपचनाच्या समस्या या वाढू शकतात. तोबड्तोब पाणी घेण्याने ऍसिडिटी आणि गॅस च्या समस्या या निर्माण होतात.
— पाणी कधी प्यावे
साधारण जेवण केल्यानंतर तीस मिनिटांनी पाणी घेणे जास्त लाभकारक ठरते आहे . पाण्याने आपल्या शरीराची तहान भागवली जाऊ शकते . जेवण केल्याच्या 30 मिनिटा नंतर पाणी पिऊ शकता. परंतु जेवण केल्याच्या 30 मिनिटे पाणी अजिबात पिऊ नका. असं करणे टाळावे.