लग्नाच्या तयारीसाठी करा असे काही
हॅलो आरोग्य ऑनलाईन । यावर्षी कोरोनामुळे अनेकांना आपली लग्ने अगदी छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्येच उरकावी लागली . कोरोनामुळे मोठे कार्यक्रम करण्यास बंदी आल्यामुळे अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोहळे उरकावे लागले आहेत . यावर्षी मात्र लग्नाचे सोहळे मोठे होताना दिसत नाहीत. पण काही दिवसांपासून लग्न सोहळे जरा चांगले व्हायला लागले आहेत . घरात लग्न सोहळा म्हंटल लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सगळे जण तयारी करत असतात. त्यामुळे जरी लग्न सहा महिने दूर असेल तर मात्र तयारी आत्तापासूनच सुरुवात करा. तयारी करताना कशी सुरुवात केली पाहिजे ? याची माहिती घेऊया …
लग्न ठरताना दोन्ही कुटुंबातील लोकांनी होकार दिला असेल तर लग्नाच्या तयारीसाठी सुरुवात करणे आवश्यक असते. जरी लग्न खूप दिवस दूर असले तरी मात्र वेळ कसा निघून जातो ते कळत नाही. लग्न एका दिवसाचे असते. पण तयारी मात्र खूप दिवस अगोदर करावी लागते. सुरुवातीपासूनच लग्न कुठे करायचे आणि हॉल कसा असावा यांचे नियोजन करा. म्हणजे अचानक हॉल मिळत नाही अश्या समस्या नकोत आजकाल सगळी लग्न जवळपास अर्धा अर्धा खर्च अश्याच अनुषंगाने होत असतो. त्यामुळे दोन्ही कुटुंबातील लोकांनी त्याबाबत नियोजन केले जावे. तसेच जेवणाचे कोणते पदार्थ असणे आवश्यक आहे , कोणते ठेवले गेले पाहिजेत याची माहिती घ्या. आणि त्यापद्धतीने नियोजन करा.
नवरा मुलगा आणि नवरी मुलगी यांचा लग्नाचा पोशाख हा योग्य पद्धतीचा निवडला जावा. आजकाल प्री वेडिंग शूट पासून ते मेहंदी च्या कोन पर्यंत सगळी तयारी अगोदरच करावी लागते. तसेच लग्नात असलेले वेगवेगळे पोशाख निवडणे आणि त्यावर योग्य प्रकारचा अलंकार असणे आवश्यक आहे . त्यामुळे या ड्रेस वर हा पोशाख योग्य असेल कि नसेल याची कल्पना येण्यासाठी अगोदरच एकदा पोशाख हा तयार करून वापरून पाहावा. म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीराला योग्य कि अयोग्य आहे हे लक्षात येईल .नवरा आणि नवरी मुलगी एकमेकांना सूट होतील अशीच कपडे घ्या . तसेच काही दिवस अगोदर स्किन ट्रीटमेंट करा. म्हणजे चेहरा उजळेल .