केस पांढरे न होण्यासाठी घरगुती उपाय कोणते ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । तुमचे केस अकाली पांढरे होणे हि तर मोठी समस्या आहे . एका ठराविक वयानंतर केस हे पांढरे होतात. पण मात्र तुमचे केस हे जर अगदी तरुण वयातच पांढरे होत असतील तर मात्र ते तुमच्यासाठी आणि तुमच्या सौदर्यासाठी अजिबात योग्य नाही . अनेक व वेळा तुम्ही मैत्रिणी गप्पा मारत असताना जर चुकून एखादा पांढरा केस मैत्रिणींच्या समोर आला तर मात्र आपल्याला खूप लाजिरवाणे वाटते . त्यामुळे कमी वयात केस पांढरे न होण्यासाठी काय उपाय केले जावेत आणि कोणत्या घरगुती पद्धतीचा वापर करू शकता ते जाणून घेऊया …
आपल्या केसांसाठी कांद्याचा रस लावा. कांद्याच्या रसाच्या मदतीने आपले केस पांढरे होण्यापासून दूर ठेवू शकतात . कांद्याची पेस्ट तयार करून त्याच्यामध्ये काही प्रमाणात लिंबाचा रस टाका . ते सारे मिश्रण एकत्र करून त्याचा वापर हा आपल्या केसासांठी करू शकता. त्याचा वापर कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी करावा . त्यामुळे केस पांढरे होण्याच्या समस्या या दूर होतात. केसांना ज्यावेळी कांद्याचा रस लावू त्यावेळी मात्र थंड पाण्याच्या मदतीने केस धुतले जावेत .
आवळा हा तुरट असल्याने तो खायला कोणालाच आवडत नाही . पण त्याचे खूप सारे फायदे आहेत . आपल्या केसांच्या वाढीसाठी आणि केसांचा पोत सुधारण्यासाठी आवळा याचा वापर हा केला जावा. आवळा हा आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे . आवळ्याची छोटी पेस्ट तयार करू त्याचा वापर हा आपल्या केसांसाठी केला असता . केस काळेभोर आणि मजबूत राहण्यास मदत होते . तसेच आवळ्याच्या पेस्ट मध्ये बदामाचे तेल घालून त्याच्या मदतीने जर केसांना मसाज केला तर ते फायदेशीर असणार आहे .आवळा