एक ग्लास डाळिंब ज्यूसचे असलेले फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आता उन्हाळा सुरु झाला आहे . उन्हाळ्याच्या दिवसांत आहारात नेहमी थंड पदार्थांचा वापर हा केला जातो. त्यासाठी आहारात डाळिंब , गाजर , काकडी किंवा ताक याचा वापर हा केला जातो. काकडी हि उन्हाळ्याच्या दिवसांत आहारात दररोज ठेवली गेली पाहिजे . काकडी , बिट , मुळा अशी जी थंड फळे आहेत त्याचा वापर कोशिंबीर च्या स्वरूपात करून ते आहारात घेतले गेले पाहिजे. तसेच डाळिंब हे सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने प्रभावी आणि थंड आहे . त्यामुळे डाळिंब याचा ज्यूस घेऊन शरीराला आराम मिळू शकतो . त्याबद्धल जाणून घेऊया ….
डाळिंबाच्या फळामध्ये जास्त प्रमाणात अँटीबॅक्टरील घटक आहेत . त्याच्यामध्ये फायबरचे सुद्धा प्रमाण हे जास्त आहे . फायबर जास्त असल्यामुळे ते पचनास सुयोग्य असेच आहे . दररोज च्या आहारात जर नियमितपणे त्याचे सेवन केले तर किंवा मुलांना दररोज काही प्रमाणात डाळिंब खायला दिले तर त्यावेळी मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. डाळिंबामध्ये जास्त प्रमाणात सी व्हिटॅमिन असते . ते आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.
नियमितपणे जर तुम्ही डाळिंब खात असाल तर मात्र तुमची त्वचा हि उजळते आणि त्वचेला मुलायम पणा यायला मदत होते. तोंडावर जेवढे मुरूम आहेत ते दूर करण्यसाठी डाळिंब हे खूप पोषक आहे . जर तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असेल तर त्यावेळी डाळिंब हे खाल्ले जाते. डाळिंब ज्यूस हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे . जर ताप आला असेल त्यावेळी डाळिंबाचा आहारात वापर करा. त्यामुळे तोंडाला गेलेली चव सुद्धा यायला मदत होते. तसेच उलटी आणि मळमळ हि कमी होते . तापातील उष्णता कमी करण्याचे काम डाळिंब करते.