जाणून घ्या का महत्वाचे असतात गर्भसंस्कार ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । भारतीय संस्कृतीत संस्काराला खूप महत्व आहे . एका विशिष्ट कुटुंबात जन्माला आल्यानंतर त्याला एक ठराविक संस्कार दिले जातात. प्रत्येक कुटुंबासाठी संस्कारला खूप महत्व दिले जातात. प्रत्येक प्रदेशात ज्या प्रमाणे भाषा हि वेगवेगळी आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे आहार, राहणं, खाणं पिणं , तसेच तेथील परंपरा तेथील संस्कार सुद्धा असतात . बाळ जन्माला येण्यापूर्वीच त्याच्यावर वेगवेगळे संस्कार केले जातात. त्यालाच गर्भसंस्कार असेही म्हणतात. भारतातील संस्कृतीत गर्भसंस्कार का केले जातात ? याची माहिति घेउया ….
भारतीय पारंपरिक पद्धतीच्या संस्कारानुसार बाळ ज्यावेळी पोटात असेल तर त्यावेळीच त्याच्यावर संस्कार झाले गेले पाहिजेत , तसेच बाळ जन्माला येताना बुद्धिवान जन्माला आले पाहिजे . यासाठी गर्भसंस्कार केले जातात. भारतीय संस्कृतीमध्ये गर्भधारणा झाल्यावर तिसऱ्या तिमाहीनंतर आणि दुसऱ्या तिमाही नंतर गर्भवती महिलेची ओटी भरली जाते. हा देखील तिच्यावर आणि तिच्या होणाऱ्या बाळावर केला जाणारा संस्कारच आहे. घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याचे स्वागत आर्शीवाद आणि प्रेमाने करण्यासाठी केला जाणारा हा एक संस्कार आहे. या काळात गर्भवती महिला जास्तीतजास्त आनंदी कशी राहील याची काळजी घेतली जाते. कारण तिच्या मनातील विचारांचा तिच्या होणाऱ्या बाळावर परिणाम होत असतो. तिला की काय खावे वाटते , तिला कसे राहायला आवडते याचा विचार केला जातो. बाळाच्या आईसाठी आणि बाळासाठी प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो.
गर्भसंस्कार हा केवळ एखादा धार्मिक विधी नसून विज्ञान आणि वैद्यकीय शास्त्रानेदेखील गर्भसंस्काराचे महत्त्व मान्य केले आहे. गर्भधारणा होताना निर्माण होणाऱ्या प्रथम पेशीपासून गर्भावर संस्कार होत असतो. गर्भसंसस्कार हे आईवडिलांच्या विचारातून बाळावर होत असतात. बाळ जन्माला येणाऱ्यापूर्वी मातेच्या मनात बाळाच्या भविष्याविषयी शुभ विचार मनात असतील तर जन्माला येतात. तसेच ज्या महिलांच्या पोटात गर्भ वाढत आहे. त्या महिलांना अनेक शूर वीरांची पुस्तके वाचायला दिली जातात. त्यामुळे त्याचा परिणाम हा बाळाच्या वाढीवर होत असतो. जर त्या काळात आईवडीलांचे मन निराश असेल तर त्या संततीवर तश्याच विचारांचा प्रभाव हा पडत असतो. प्रत्येक आई वडिलांना गर्भसंस्काराचे महत्व माहित असणे गरजेचे आहे .
महिलांसाठी आपल्या पोटात बाळ वाढते हि भावना त्यांच्यासाठी सुखावह असते . तिच्या आजूबाजूला जे वातावरण असते ते मात्र आईसाठी सुखावह असेच असते . तिच्याशी तिच्या पतीचे आणि होणाऱ्या बाबाचे नाते, नातेवाईकांशी असलेले नातेसंबध या सर्व गोष्टींचा बाळावर परिणाम होत असतो. कारण गर्भातील बाळ आजूबाजूचे वातावरण आणि आईवडिलांचा संवाद ऐकत असते. अनेक वेळा असे पाहण्यास आढळून आले आहे कि , जर बाळ पोटात वाढत असेल त्यावेळी त्या व्यक्तीचा छळ हा जास्त होत असेल तर मात्र त्यावेळी ते बाळ एकतर बंड खोर निघते किंवा आत्मविश्वास गमावून बसलेले आहे . असे काहीसे लक्षात येते . सतत आईने बाळाशी संवाद साधला तर मात्र बाळ आणि आई यामध्ये खूप छान असे बॉण्डिंग निर्माण होऊ शकते . आईशी बाळाचं नातं हे नाळेने जोडलेलंच असतं. मात्र वडिल आणि इतर नातेवाईक गर्भातील बाळाबद्दल शुभविचार करून त्यांच्याशी गर्भापासून आपलं नातं जोडू शकतात. त्या काळात आईच्या स्वभावात खूप बदल होताना दिसून येतात. तिच्या विचारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आढळते . नेहमी आपल्या बाळासाठी सकारात्मक विचार करत चला.