उंदरापासून सुटका होण्यापासून कोणते घरगुती उपाय करू शकता ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । जर तुमचे घर मातीचे असेल तर त्या घरात उंदरे खूपच आढळतात. आजकल कुठे जास्त प्रमाणात मातीची घरे दिसत नाहीत पण सिमेंट काँक्रेट च्या घरात सुद्धा उंदरांचा प्रभाव हा जास्त आढळतो. अशा वेळी आपल्याला आपल्या घरातील कपड्यांपासून ते इलेक्ट्रिकल वस्तूंपर्यंत सगळ्या गोष्टीना जपावे लागते . जर घरात पुस्तके हे जास्त असतील तर त्याचे तुकडे तुकडे केले जातात. अनेक किमती वस्तूंची नासधूस उंदीर करतात. अशा वेळी त्यांना मारून बाहेर टाकण्यापेक्षा कोणत्या उपायांनी ते स्वतःहून निघून जातील याबद्धल माहिती घेऊया ….
उंदीर यांचा प्रभाव हा जास्त प्रमाणात घाणीच्या जागी असतो. ज्या ठिकाणी अडगळ आहे , किंवा जेथे कोणाचा वावर नाही त्या ठिकाणी त्याचे प्रस्थान असते . जर त्यांचा वावर हा स्वयंपाक घरात जास्त असेल , उंदरांनी जर एखाद्या पदार्थाला तोंड लावले आणि आपण जर चुकून तोच पदार्थ आपण खाल्ला तर मात्र आपल्याला वेगळ्याच आजाराला सामोरे जावे लागू शकते. उंदरांना खूप जास्त प्रमाणात घाण आवडते. त्यामुळे ते घाणीत राहायला पसंती करतात. त्याच्या माध्यमातून आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे घरात उंदरे नसतील याची काळजी घेतली जावी .
उंदरांना अजिबात उग्र वास हा पसंत नाही . त्यावेळी मात्र या ज्या ठिकाणी उंदरांचा वावर आहे त्या ठिकाणी एक कांदा कापून ठेवा . कांदयाच्या उग्र वासाने उंदीर घरात येणार नाहीत . सतत त्रास जास्त असेल तर त्यावेळी बाजारातून एकदा उंदरांचा सापळा घेऊन या आणि उंदराना जी वस्तू जास्त आवडते , ती वस्तू त्याच्या आत मध्ये ठेवा . त्यामुळे उंदीर आत मध्ये अडकले वाजतील. तसेच बदामाचा तेलाचा वास हा जास्त येतो. त्यावेळी बदामाचे तेल हे कापसावर घ्या , आणि ते उंदीरांच्या जागेवर ठेवा . ते घरात येण्यापासून दूर पळून जातील .