What are the benefits of a bowl of cold curd?
|

एक वाडगा थंड दही खाण्याचे काय आहेत फायदे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  आजूबाजूचे वातावरण हे उन्हाळ्याच्या दिशेनं जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत आपले शरीर हे थंड राहण्यासाठी तसेच उष्णतेच्या समस्या या कमी होण्यासाठी कोणता ना कोणता तरी थंड पदार्थ खाणे गरजेचे असते. अशा वेळी आहारात रासायनिक पदार्थाचा वापर करण्यापेक्षा घरगुती पदार्थांचा वापर करणे आवश्यक आहे . त्यासाठी घरगुती पद्धतीने तयार केलेलं दही खाल्ले तर मात्र शरीराला फायदाच होतो. दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते . ते आपल्या शरीराला प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते .

उन्हाळ्याच्या दिवसांत जर आपण बाहेर च्या थंड पदार्थांचा वापर केला, तर गळ्याच्या समस्या या जास्त निर्माण होतात. खोकला , सर्दी , ताप या समस्या वाढू शकतात. त्यामुळे दही घेणे आरोग्यास हितकारक आहे . दह्यामध्ये प्रोबियॉटिक्स हे घटक असतात. त्यामध्ये बॅक्टरीया याचे प्रमाण सुद्धा जास्त असते . दुधा मुळे तयार होणाऱ्या दह्यामध्ये कॅल्शियम ,व्हिटॅमिन बी १२ ,फायबर याचे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे ते आपल्याला खूप फायदेशीर असणार आहे .

प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत —-

आपल्या आहारात दही ठेवले तर मात्र प्रतिकार शक्तीत वाढ होण्यास मदत होते. पचन व्यवस्था हि सुधारवण्यासाठी दही खूप मदत करते . ज्यावेळी पोट साफ होत नाही . किंवा जास्त प्रमाणात जुलाब आणि लूस मोशन याच्या समस्या असतील तर त्यावेळी मात्र एक वाटीभर दही खाण्यास घेतले जावे .

रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते —

जर तुम्हाला हार्ट अटॅक च्या समस्या जास्त जाणवत असतील तर त्यावेळी मात्र आहारात दही घेतले तर त्याचा फायदा हा होतो. असे संशोधन अमेरिकेच्या हार्ट असोशिएशन च्या मदतीने करण्यात आले आहे . दररोज दही खाल्याने हायपर टेंशन च्या समस्या या खूप कमी होण्यास मदत होऊ शकते .

हाडे बळकट राहण्यास मदत होते —-

जर आहारात दही असेल तर त्यावेळी मात्र आपल्याला हाडे मजबूत राहण्यास मदत होते . व्हिटॅमीन आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात राहिल्याने हाडांच्या वेदना या दूर जातात. तसेच बळकटी मिळण्यास सुद्धा मदत करते .

केसांसाठी आहे फायदेशीर —

आहारात दही घेतल्याने ते केसाच्या समस्या दूर होतात. तसेच केस तुटत असतील तर केसांना दही लावल्याने आपल्या केसाच्या वाढीत परिणाम जाणवतो. केस हे मजबूत राहण्यास मदत होते .