घरगुती उपायांचा वापर करून घालवू शकता टॅन
हॅलो आरोग्य ऑनलाईन । शरीरावरचा टॅन हा निघून जाण्यासाठी अनेक मुली वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉडक्ट चा वापर करतात . हातांवरील आणि पायावरील टॅन निघून जाण्यासाठी नेहमी वॅक्स चा वापर हा केला जातो. उन्हाळा सुरु झाला कि उन्हाच्या झळा बसून शरीर हे काळे पडायला सुरुवात होते . शरीर काळे जर पडले तर मात्र आपली त्वचा हि काळपट पडते आणि सौदर्य खालावते . म्हणून रासायनिक पदार्थाचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक आणि घरगुती पद्धतीचा वापर केला तर मटार आपल्या शरीरावरील टॅन हा काढू शकतो. कसा ते जाणून घेऊया….
टोमॅटो रस —
आपल्या आहारात टोमॅटोचा वापर हा केला जातो. पण टोमॅटोच्या बियांचा वापर हा कमी प्रमाणात आहारात केला जातो . अशा वेळी टोमॅटो बिया या फेकून देण्याऐवजी त्यांचा वापर आपल्या चेहऱ्यासाठी केला जाऊ शकतो. टोमॅटोच्या बिया आणि टोमॅटो याचा रस तयार करून तो काही वेळ आपल्या चेहऱ्यावर आणि शरीरावर लावा . काही वेळ हा रस तसाच सुकून द्या . म्हणजे आपल्या चेहऱ्यावर असलेले पोअर्स हे कमी होतील आणि पिंपल्स येणे बंद होईल . कमीत कमी अर्धा तास हा रस लावून तसाच ठेवा . त्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवून काढा . काही वेळातच त्वचा हि उजळलेली दिसेल .
लिंबाचा रस—
लिंबाचा रस हा आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे . त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण हे जास्त असते . त्यामुळे ते आहारात असणे गरजेचे आहे . त्याचबरोबर त्याचा वापर हा ब्लीचिंग एजेंट म्हणून केला जातो. त्यामुळे चेहरा उजळण्यास मदत होते . पण हा लिंबाचा रस हा डायरेक्ट वापरू शकत नाही. कारण त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड असते . त्यामुळे त्याचा वापर करताना नेहमी पाणी घालूनच वापर केला पाहिजे .