दीर्घ श्वास आरोग्यासाठी फायदेशीर; यामुळे आपल्या ‘या’ समस्या कायमच्या सुटतील
हॅलो आरोग्य आॅनलाईन | एका कासवाच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य हे त्याच्या शांत, खोल श्वासात आहे. कासव हे मिनिटाला फक्त ४ वेळा श्वास घेते आणि काही कासवांच्या जातींचे आयुष्यमान असते १०० ते १५० वर्षे. तर ससा या प्राण्याचे आयुर्मान हे जास्तीत जास्त ८ ते १२ वर्षे एवढे संक्षिप्त असते. कारण काय त्याच्या श्वासाची गती मिनिटाला ३६ एवढी असते. आता मानवाचे पाहू, एका मिनिटामध्ये मानवप्राणी १२ ते १६ एवढ्या वेळेला श्वासोच्छवास घेतो आणि सरासरी आयुष्यमान ७० वर्षे आहे. म्हणजेच श्वासाचा सरळसरळ संबंध आपल्या आयुष्यमानाशी आहे. Benefits Of Prolonged Breathing Exercises
दीर्घ श्वास घेण्याचे अनेक फायदे असून उत्तम आणि निरोगी जीवन जगण्याचा हा एक प्रशस्त मार्ग आहे. श्वास घेण्याच्या विविध तंत्राच्या माध्यमातून आरोग्याशी संबंधित समस्या दूर केल्या जाऊ शकतात. तणाव, हृदयरोग आणि पचन प्रणाली सुधारण्यासाठी दररोज खोल श्वास घेण्याचा सराव करा. जर आपण आपल्या दैनंदिन व्यस्थतेतून थोडासा वेळ घेतला आणि दीर्घ श्वास घेण्याचा सराव केला तर झोप चांगली येते. परंतु श्वासोच्छवास घेण्याचे पण योग्य नियम माहित असले पाहिजेत तरच याचे फायदे शरीराला मिळतील. नाकाने दीर्घ श्वास घेतल्याने हवा फुप्फुसांमध्ये पोहोचल्यावर आधी ती गरम होते. यामुळे सर्दी-खोकला होण्याची शक्यता कमी असते. तसेच नाकात असलेले छोटे-छोटे केस हे धुळीचे कण आणि हानिकारक जीवाणूंना फुप्फुसांमध्ये जाण्यापासून अटकाव करतात. Benefits Of Prolonged Breathing Exercises
दीर्घ श्वास घेण्याची योग्य पद्धत:
आरामात बसून किंवा आडवे झाल्यानंतर, म्हणजेच सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपताना नाकात दीर्घ श्वास घेऊन हळूहळू पोटात हवा भरा. यानंतर, नाकाद्वारे हळूहळू हवा काढून टाका. ही क्रिया करत असताना एक हात आपल्या पोटावर आणि दुसरा हात छातीवर ठेवा. हळूहळू श्वास घेत असताना पोटात हवा भरण्याची क्रिया जाणवते.
ताण – तणावावर नियंत्रण:
लघू श्वास हा मुख्यतः ताण आणि चिंतेशी संबंधित आहे. तणाव आणि चिंता टाळण्यासाठी आपण खोल श्वास घेणे खूप महत्त्वाचे आहे. हे आपल्या शरीराला पुरेसा ऑक्सिजन प्रदान करेल आणि आपण लवकरच चिंता मुक्त व्हाल. Benefits Of Prolonged Breathing Exercises
हृदयासाठी फायदेशीर:
दीर्घ श्वास घेतल्यास आपल्या हृदयाची लक्षणीयरीत्या कार्यक्षमता वाढते आणि आपण चरबी सहजपणे कमी करू शकता. एका अभ्यासानुसार, हार्ट अटॅकनंतर श्वासोच्छवासाच्या तंत्राचा अवलंब केलेल्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ५० टक्के कमी झाला. म्हणूनच हृदयरोग्यांनी नियमितपणे दीर्घ श्वास घेण्याचा सराव करावा.