होळीसाठी करा नैसर्गिक पद्धतीने रंग तयार
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आज होळीचा दिवस आहे. सगळीकडे रंगांची उधळण केली जाते. त्यासाठी वेगवेगळ्या रासायनिक रंगाचा वापर हा केला जातो. पण हेच रासायनिक रंग आपल्या त्वचेला आणि आपल्या चेहऱ्याला हानिकारक ठरू शकतात. सगळीकडे कोरोनाचे वातावरण आहे. जितकी काळजी घेणे शक्य आहे. तेवढ्या जास्त प्रमाणत काळजी हि घेतली गेली पाहिजे. रासायनिक रंगांचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक पदार्थ हे कधीही योग्यच असतील . नैसर्गिक रंग हे कश्या पद्धतीने तयार करू शकतो. ते जाणून घेऊया ….
बाजारात उपलब्ध असणाऱ्या रंगांमध्ये जास्त प्रमाणात केमिकल चा वापर केला जातो. जर चुकून असे पदार्थ डोळ्यात गेले तर त्यामुळे इजा होऊ शकते. कदाचित अनेक त्वचेचे विकार हे होऊ शकतात. त्यामुळे घरगुती पद्धतीने रंग तयार करून तुम्ही होळी खेळू शकता. कसे करावेत रंग तयार ते जाणून घेऊया ….
चंदनाने तयार करा रंग —
चंदन हा आपल्या त्वचेसाठी खूप मदत करतो. चंदनापासुन जर रंग तयार केले तर आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. चंदनापासून रंग तयार करताना काही प्रमाणत लाल चंदन पावडर घ्या . त्यामध्ये कमीत कमी एक लिटर इतके पाणी टाका, त्यानंतर हे पाणी व्यवस्थित उकळून घ्या. चंदनाचा कलर हा सर्व पाण्यात मिसळून जाईल. त्यानंतर त्याच्यामध्ये कमीत कमी २० लिटर पाणी मिक्स करा. संपूर्ण पाण्याला लाल रंग प्राप्त होऊ शकेल . त्याच्यामध्ये डाळिंबाच्या साली सुद्धा टाकू शकता. चंदनाची लाल रंगाची पावडर हि रंग म्हणून वापरू शकता.
काळा रंग —
काळा रंग तयार करण्यासाठी काळ्या द्राक्षांचा रस हा एकत्र तयार करून तो पाण्यात मिक्स करा. त्यामुळे पाण्याला काळा रंग तयार होईल. तसेच तुम्हाला तपकिरी रंग हवा असेल तर त्यावेळी मात्र त्याच्यामध्ये हळद मिक्स करून त्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाका. म्हणजे तपकिरी रंग तयार होऊ शकेल.
मेहंदीने करा तयार रंग —
नैसर्गिक पद्धतीचा रंग खेळणे कधीही उत्तम . काही प्रमाणात पाणी घ्या. त्याच्यामध्ये मेहंदी हि मिक्स करा. तसेच वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून रंग तयार करू शकता.पालक , बेहडा, आपटयाची पाने वापरून रंग तयार होऊ शकतात. हिरव्या पालेभाज्यांचे वाटण करून ते पाण्यात मिक्स करा. त्याने पाण्याला हिरवा रंग प्राप्त होईल.
हळदीने करा तयार रंग —
हळद हि आयुर्वेदिक आहे. त्याच्यापासून ओला तसेच कोरडा रंग तयार करू शकतो. हळदीमध्ये काही प्रमाणात पाणी मिक्स करा. आणि त्याच्यामध्ये बेसन चा सुद्धा वापर केला जाऊ शकतो. बेसन वापरल्याने अजून कलर गडद झाला जाईल. हळदीच्या मदतीने कोरडा रंग खेळू शकतो.