कोपऱ्याचा काळपटपणा असा करा दूर
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या हातावरील कोपरा हा काळा पडलेला दिसतो. त्यावेळी मात्र आपल्याला खूप घाण वाटते. पण हा कोपरा अस्वछतेमुळे काळा पडला आहे, असे ज्यावेळी कळते त्यावेळी आपल्याला स्वतःचाच राग येतो. आपल्याला इतर लोकांचा काळवंडलेला हात दिसल्यानंतर मात्र घाण वाटते. दररोज अंघोळ करताना आपला हात साफ होत नाही . त्यामुळे त्वचेवर घाण तशीच साठत जाते . कोपऱ्याच्या भागात मृत पेशी वाढत जातात. ते दिसताना खूप खराब दिसते . अशा वेळी कोणत्या घरगुती उपायांचा वापर करून कोपऱ्यावरील घाण काढू शकता. ते जाणून घेऊया ….
— एका वाटीत काही प्रमाणात दही घ्या . त्या दह्यामध्ये बेसन चे पीठ घालून ते एकत्र मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण हे आपल्या कोपऱ्याच्या भागात लावा. कमीत कमी दहा मिनिटे ते मिश्रण लावल्यानंतर ते धुवून काढा. काही दिवस हि प्रक्रिया दररोज केल्याने आपला कोपरा हा स्वच्छ होऊ शकतो.
— लिंबाचा रस सुद्धा आपल्या कोपऱ्याच्या भागात प्रभावी पणे काम करते. एका वाटीत लिंबाचा रस घ्या आणि तो कापसाच्या मदतीने तो रस हा आपल्या कोपऱ्यात लावा. काही दिवसांत फरक पडलेला दिसून येईल.
— एका वाटीत एक चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यामध्ये काही प्रमाणात साखर टाका. थोडे पाणी टाकून त्याची चांगली अशी पेस्ट तयार करा. आणि ती पेस्ट आपल्या हातावर लावा. काही दिवसांत काळा रंग निघून जाण्यास सुरुवात होईल.
— काकडीचा रस सुद्धा आपल्या कोपऱ्यांसाठी प्रभावी पणे काम करते .