का खावा आहारात राजमा ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या , कडधान्ये तसेच धान्य याचे उत्पन्न घेतले जाते. राजमा हे कडधान्ये देशाच्या सर्व भागात पिकले जाते. राजमा म्हणजे महाराष्ट्रात घेवडा या नावाने ओळखला जातो . ग्रामीण भागात घेवड्याचे उत्पन्न हे जास्त होते. परंतु याची भाजी जास्त प्रमाणात केली जात नाही . उत्तर भारतात राजमा या पिकाला खूप महत्व आहे. राजम्याची भाजी हि खूप आवडीने खाल्ली जाते. उत्तर भारतात हॉटेलमधील एक चविष्ट पदार्थ म्हणून त्याला मान्यता आहे. स्पेशल मेनू मध्ये राजमा चा समावेश आहे. राजमाची भाजी हि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप लाभकारक आहे. कशी ते जाणून घेऊया ….
— राजमा मध्ये जास्त प्रमाणात प्रोटिन्स आणि जीवनसत्वे असतात. या भाजीचा समावेश आहारात असणे गरजेचे आहे. त्याच्या सेवनामुळे मेंदूची क्षमता वाढण्यास मदत होते. ऊत्तर भारतातील लोक हा पदार्थ खाण्याकडे खूप कल असतो. कारण त्या एका पदार्थामधून खूप सारे जीवनसत्व मिळण्यास मदत होते.
— राजमामध्ये असलेले विशेष घटक हे मेंदूच्या वाढीसाठी मदत करतात. त्याच्या सेवनाने मेंदू हा तल्लख राहण्यास मदत होते.
— ज्या लोकांना मधुमेह आहे . त्या लोकांच्या आहारात राजमा असला पाहिजे. कारण त्यामुळे साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. नैसर्गिक रीत्या साखर पुरवण्याचे काम राजमा करत असते.
— राजमामध्ये असलेले व्हिटॅमिन बी हे मेंदूच्या वाढीसाठी मदत करते.
— राजमामुळे एनर्जी वाढते .
— ज्या लोकांना अल्झामर याचा त्रास आहे , त्या लोकांनी राजमा आहारात ठेवावा.
— शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असेल तर त्यावेळी राजमा रक्ताचे प्रमाण वाढवण्यास मदत करते .
— अनेक मुलींच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी असते, हिमोग्लोबिन आणि रक्ताचे प्रमाण वाढण्यासाठी राजमा खाल्ला जावा.