इतके मोठे झालात तरी नखे कुरतण्याची सवय तुम्हालाही आहे ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत अनेक व्यक्तींना नखे कुर्त्तडण्याची सवय असते. नखे जर वाढली तर ती आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. नखे खाणे हि सवय फ़ार चुकीचे आहे अन आरोग्याला हानिकारक आहे. एकवेळ लहान मुलांमध्ये हि सवय असेल तर आपण समजू शकतो. परंतु अनेक मोठ्या माणसांनासुद्धा नखे खाण्याची सवय असल्याचे दिसून येते. अनेकजणसुद्धा कामाच्या टेन्शन मुळे नखे कुरतडतात. How to Stop Nail Biting
अनेक जणांना काही गोष्टींचे टेन्शन आले कि नखे खाण्याची सवय असते. डोक्यात विचाराचे वारे वाहत असताना काहीतरी कृती म्हणून माणूस नखे खातो असं मानसशास्त्र सांगता. नखे खाताना मेंदूचे लक्ष त्या एका गोष्टीवर केंद्रित होते अन विचार प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने होते असं मानसशाश्त्राचा अभ्यास सांगतो. हे खरं असलं तरी नखे खाण्याने भयंकर आजाराला आपल्याला सामोरे जावे लागते हे समजून घेणेही तितकेच महत्वाचे आहे. नखे खाण्याच्या सवयीमुळे नखात खान तोंडावाटे पोटात जाते अन हीच गोष्ट आजाराला आमंत्रण ठरते. How to Stop Nail Biting
पण मुळात माणूस नखे खातोच का हे आपण पहिले समजून घेऊयात –
– मानसिक अस्वस्थता
– ताण-तणाव
– एकटेपणा
– अति विचार करणे
– कमी आत्मविश्वास
– भीती
– लहान मुलांमध्ये असणारी सवय (लहान मुलांमध्ये असणारी असुक्षिततेची भावना तसचे कधी-कधी अगदी लहान मुलांमध्ये असणाऱ्या सवयीला काही कारण असेलच असे नाही चाळा किंवा तोंडात बोट घालायच्या सवयीमुळे किंवा कोणाची बघून लागलेली सवय.) How to Stop Nail Biting
नखे खाण्याच्या सवयीचा आरोग्यावर काय परिणाम होतो ?
– नखं कुरतडणे हे कमी आत्मविश्वास दर्शवते. त्यामुळे व्यक्तीला कसली तरी चिंता आहे असं समोरची व्यक्ती समजते. तसेच व्यक्ती अस्थिर मनोवृत्तीची आहे असे समजले जाऊ शकते.
– नखातील मळ, घाण पोटात गेल्याने लहान मुलांना आणि प्रौढांना देखील पोटदुखी आणि अपचन यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
– काहीजणांना नखांबरोबर त्याच्या बाजूची त्वचा खाण्याचीही सवय असते. यामुळे नखांना नखुर्डे होण्याची शक्यता असते.
– नखे खाताना समोरच्या व्यक्तीला किळस येऊन तुमची गणना अस्वच्छ व्यक्ती मध्ये होऊ शकते.
नखे खाण्याची सवय मोडण्यासाठी काय करावे?
– हि सवय मोडण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे नखे नेहमी कमी ठेवणे व वरचेवर नखे कापणे.
– स्वतःच्या मनाला नखे खाण्यापासून दूर ठेवावे. यासाठी तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवता येणे गरजेचे आहे.
– कामाला बसताना नखे मिठाच्या पाण्यात बुडवून बस. जेणेकरून जेव्हा तुम्ही नखे तोंडात घालाल तेव्हा खारट चव लागून तुम्हाला तुमची चूक लक्षात येईल.
– मनावर ताबा उत्तम ताबा. स्वतःच्या मनावर ताबा ठेऊन वारंवार नखे खाण्याची इच्छा झाली तरी स्वतःला आवरा.
– सुरवातीचे काही दिवस तुम्हाला हे अवघड जाईल मात्र नंतर काही दिवसांतच तुमची सवय मोडेल.