वजन कमी केले पण पोट कमी होत नाही, ‘हे’ उपाय करून पहा; होईल चमत्कार
हॅलो आरोग्य ऑनलाईन । वाढते वजन सध्या बदलत्या आणि सुस्त जीवनशैली मुळे एक मोठी समस्या बनली आहे. लठ्ठपणा मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि यामुळे हा दुसऱ्या अनेक आजारांचे मुळ कारण बनत आहे. तुम्ही जर वेळेतच तुमचे वजन नियंत्रणात ठेवले नाही तर वजन वाढण्यास वेळ लागणार नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला योग्य डाएट आणि चांगला आहार घेणे गरजेचे असते. जर वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम करत आहात आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी योग्य डाएट फॉलो करत आहात तर तुम्ही योग्य पद्धतीने वजन कमी करत आहात. अनेकदा लोक वजन कमी करूनही त्यांची पोटाची चरबी काही कमी करत नाही. मात्र आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आमच्याकडे यावरचे घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे तुम्ही पोटावरची चरबी कमी करू शकता.
पोटावरची चरबी कमी करणार दालचिनी आणि मध
दालचिनी डायबिटीज कमी करण्यास फायदेशीर असल्याचे तुम्ही पाहिले असेल. मात्र आम्ही तुम्हाला सांगतोय की दालचिनीचा वापर तुम्ही वजन कमी करण्यातही करू शकता. तुम्ही याचा वापर करून तुम्ही एका दगडात दोन पक्षी मारू शकता. यासाठी तुम्हाला मधाची गरज पडेल. जर दालचिनी आणि मध एकत्रित मिसळून घेतल्यास पोटावरची चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
वजन कमी करण्यासाठी खा ओवा
पोटदुखी आणि अपचनामुळे पोतफुगी साठी आपण ओव्याचा वापर नेहमीच करतो त्यासोबतच पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही ओवा खाऊ शकता. यासाठी तुम्ही ओव्याचे पाणी पिऊ शकता. यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल. यासाठी रात्री एक कप पाण्यात ओवा भिजत घाला आणि सकाळी उठून रिकाम्या पोटी हे पाणी प्या.
संतुलित आहार
आपल्या आहारात असा गोष्टींचा समावेश करा ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतील. हिरव्या भाज्यामध्ये हे घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. गाजरामध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक असे पोषकतत्वे असतात. तसेच बीन्स यामध्ये पोषकतत्वांचा खजिना आहे. हे दोनही पदार्थ तुम्ही तुमच्या सलाडमध्ये समाविष्ट करू शकता. पोटावरची चरबी कमी कऱण्यासाठी सगळ्यात गरजेचा आहे संतुलित आहार. जेवणाच्या ३० मिनिटेआधी तुम्ही सलाड खाल्ल्यास पोटावरची चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होईल. यासोबतच लेमन टी अथवा ग्रीन टीही घेऊ शकता. पोटावरची चरबी कमी कऱण्यासाठी संतुलित आहार हा अतिशय आवश्यक आहे.
फळे आणि भाजीपाल्याचा करा समावेश
भाजी आणि फळांमध्ये कॅलरी कमी असतात त्यामुळं ते जास्त प्रमाणात खावे. केळ आणि चिकू खाऊ नये त्यानं लठ्ठपणा वाढतो. जेवताना टॉमेटो आणि कांदाच्या कोशिंबीरमध्ये मिरे आणि मीठ घालून खावे. त्यानं शरीराला विटामिन सी, ए, के, लोह, पोटॅशिअम, लायकोपिन आणि ल्यूटिन मिळतं. ताज्या पुदिन्याच्या पानांची चटणी करुन चपातीसोबत खावी. पुदिन्याचा चहा पिल्यास वजन नियंत्रित राहतं. एक चमचा पुदीना रसामध्ये 2 चमचे मध मिसळून प्यायलास लठ्ठपणा कमी होतो. जेवणापूर्वी गाजर खावे. जेवणापूर्वी गाजर खाल्यास भूक कमी होते.
एका कपात उकळत्या पाण्यात अर्धा चमचा बडिशोप टाका. 10 मिनिटं त्याला झाकून ठेवा. ठंड झाल्यानंतर ते पाणी प्यावं. तीन महिने केल्यास वजन कमी होते. हिरडा आणि बेहडाचं चूर्ण बनवा. एक चमचा चूर्ण 50 ग्राम परवलच्या रसासोबत नेहमी घ्या, वजन मोठ्या प्रमाणात कमी होण्यास सुरुवात होईल. कारल्याची भाजी खाल्यास वजन कमी होण्यास मदत होते. शेवग्याचा नियमित वापर केल्यास वजन नियंत्रित राहतं.
सुंठ, दालचिनीच्या साली आणि काळी मिरे (3-3 ग्राम) बारीक करुन चूर्ण बनवावं. सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी हे चूर्ण खावं. पपई नियमितपणे खावी. पपई सगळ्या सीजनमध्ये मिळते. खूप दिवस पपई खाल्ल्यास कंबरेची चरबी कमी होते. जेवणामध्ये दहीच खाल्ल्यास चरबी कमी होते. ताक ही दिवसांतून दोन-तीन वेळा प्यावं. आवळा आणि हळद समप्रमाणात घेउन बारीक चूर्ण करावं. हे चूर्ण ताकासोबत घेतल्यास कंबर एकदम सुबक होते. नेहमी सकाळी एक ग्लास पाण्यात दोन चमचे मध मिसळून प्यावं, असं केल्यानं चरबी कमी होते. सकाळी उठल्यावर 250 ग्राम टोमॅटोचा रस 2-3 महिना प्यावा चरबी कमी होण्यास मदत होते.