आहारात ‘हे’ पदार्थ ठेवा आणि कंबरदुखीला रामराम ठोका
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आजकाल कंबरदुखीच्या समस्या या जास्त वाढतच चालल्या आहेत. साधारण कंबर दुखीचा त्रास सर्वात जास्त स्त्रियांच्या मध्ये असतो. पण या त्रासाचे प्रमाण पुरुषांमध्ये तसेच तरुणांमध्ये सुद्धा पाहायला मिळते. आजच्या नवीन पिढीला हा त्रास जास्तच जाणवतो, कारण त्याच्यामध्ये असलेले स्ट्रेस आणि कामाचा ताणतणाव, प्रेशर या सगळ्या गोष्टी खचून भरल्या आहेत. त्यामुळे कंबरदुखी वाढलेली दिसून येते. स्त्रियांना याचा त्रास हा जास्तच असतो, कारण त्यांना एका ठराविक वेळी वेगवेगळ्या स्टेज मधून नेहमी जावे लागते.
कंबरदुखीवर आराम मिळावा म्हणून अनेक जण गोळ्या खातात, त्याने लगेच त्रास पण कमी होतो खर, पण सतत गोळ्या खाणे शरीराच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. काही दिवसांनी त्या गोळ्यांचा असर हा आपल्या शरीरावर पडणेच बंद होते, आणि इतर समस्या निर्माण होतात, कंबरदुखीच्या समस्या नेमक्या काय आहेत? का होते कंबरदुखी ? हे जाणून घेतले तर त्यावर नक्कीच चांगले उपाय आपण शोधू शकतो.
तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी चे प्रमाण जास्त असेल तर त्यावेळी शरीरातील कॅल्शियम शोषून घेण्याचे काम व्हिटॅमिन डी करत असते. त्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डी चे संतुलन राखणे आवश्यक आहे. त्यासाठी दररोज काही वेळ कोवळ्या उन्हात बसले पाहिजे. नैसर्गिक रित्या आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी चा पुरवठा होऊ शकतो.
घरात नेहमी डिंकाचे लाडू तयार करून ठेवा . शरीराला कमी पडलेल्या कॅल्शियम ची झीज भरून काढण्याचे काम डिंक करत असते. रोज रात्री मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवा, आणि दररोज सकाळी उठल्यानंतर पाणी आणि मेथीचे दाणे खा. लवकरच कंबरदुखीच्या समस्या दूर होतील.
अनेकांच्या घरी दररोज भाकरी हि बनवली जातेच. त्यावेळी भाकरी बनवताना त्याच्यामध्ये तिळाच्या तेलाचा वापर करून भाकरी बनवून खा म्हणजे कंबरदुखी काही दिवसांत दूर होते. तिळाच्या तेलाने मालिश सुद्धा केली जाते. भाकरी हि खूप पौष्टिक आहे.
अंघोळ करताना साधारण २० मिनिटे गरम पाण्याच्या मदतीने शेक घ्या किंवा काही वेळ तिळाच्या तेलाने पाठीची मसाज करा, म्हणजे आराम मिळायला मदत होऊ शकते.
आपल्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या दुर्वा या आयुर्वेदीक आहेत. त्या दुर्वांच्या मदतीने तुम्ही काढा तयार करा. तो काढा सकाळ आणि संध्याकाळ घायला सुरुवात करा. लवकरच कंबरदुखीवर असर पडलेला लक्षात येईल.