काय सांगता!! तुम्हालाही अकाली टक्कल पडू लागलंय, ‘ही’ आहेत कारणे आणि उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन । तुम्ही कसे दिसता आणि तुमचे आकर्षक व्यक्तिमत्व यामध्ये केसाचा वाटा 40% असतो. जोपर्यंत तुमच्या डोक्यावर झुबकेदार, काळेभोर केस असतात तोपर्यंत तुम्ही वयाने लहान व आकर्षक दिसत असता. म्हणजेच मोठे, दाट आणि बहारदार केस हे तारुण्याचे प्रतिक असतात. आणि कमी विरळ केस हे वार्धक्याचे ! आपण अनेक ठिकाणी पहिले असेल की काही लोकांचे जास्त वयामुळे केस पांढरे झालेले असतील, पण केस असतात मात्र एकदम दाट. पण अलीकडे प्रसारमाध्यमातून जाहिरातीद्वारे वेगवेगळे रासायनिक कलर, शांपु, कंडिशनर आणि तत्सम गोष्टींनी केसांवर अनेक प्रकारचे प्रयोग करून बघायची आपल्याला सवय लागली आहे. त्यामुळे होतंय काय की अकाली टक्कल पडणे, केस एकदम विरळ होणे यासारख्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. डोक्यावरचे केस एकदम कमी होणे आणि केस तुटणे ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळेच त्याची कारणे, उपाय आणि लक्षणे भिन्न- भिन्न असतात. आणि ह्या दोन्ही गोष्टींना एकच आहे अशी चुकी करू नका. कारण अशा गैरसमजामुळे तुम्ही खूपच चिंताग्रस्त होतात. आणि त्या ताण-तणावाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर पडतो.
केस गळतीची मुख्य कारणे
- केस गळणे आणि एकदम केस खूप तुटायला लागणे (baldness) ह्यात काय फरक आहे: केस गळणे एक सामान्य समस्या आहे. ज्यामध्ये ज्या केसांचे जीवन-चक्र समाप्त झाले असते ती केस आपोआप डोक्यातुन गळतात. आणि ह्यामुळे तुमच्या केसांच्या वाढण्यावर काहीच परिणाम होत नसतो. ह्या जागेवर नवीन केस यायला लागतात. त्यामुळे ही घाबरण्यासारखी गोष्ट नाहीच.
- टक्कल पडणे : ही समस्या एका रोगासारखी असते हळूहळू डोक्यावरची केस गळत जाऊन डोक्यावरची केस खूप कमी होऊन काही ठिकाणी टक्कल पडायला लागते. आणि केसांची घनता सुद्धा कमी होऊन केस विरळ होतात. आणि ह्याची कारण बऱ्याच अंशी तुमच्या शरीरातील हार्मोनल बदलामुळे, केमिकल्स, केसांवर वापरलेल्या केमिकल्सचा साईड इफेक्ट आणि अति-वापर, केसांवर गरम अशी साधनांचा वापर जसे की, हेयर स्ट्रेटनर सारखी साधने ह्यामुळेही केसांवर परिणाम होत असतो.
- कंगवा केसात फिरवताना केसांचे गळण्याचे प्रमाण: जर एखाद्या दिवशी कंगवा फिरवताना खूपच केस गळायला लागले तर असे समजू नका की तुमच्या डोक्याला आता टक्कलच पडेल. किंवा दाट केस विरळ होतील. ते कमकुवत केस असतात म्हणून ती गळतात.
- जर कंगवा व शाम्पू लावताना खूप केस गळत असतील आणि त्याचे प्रमाण जर १०० (सामान्यपणे गृहीत धरू) असेल तर त्याबाबत दक्ष असा कारण अशावेळी काही दिवसांनंतर तुम्हाला अचानक डोक्याच्या एखाद्या भागावर टक्कल पडलेली दिसते. तेव्हा त्याबाबत जागरूक असा.
- टक्कल पडण्याची / केस खूप विरळ होण्याची लक्षणे: खरं म्हणजे टक्कल कोणत्या वेळी पडते ज्यावेळी आपल्या हेअर फॉलिकल मधून एकही नवीन केस उगवत नाही. नवीन केस उगवण्यासाठी काही अडचण येत असेल किंवा नवीन केस उगवणे बंदच होऊन जाते. आणि हे शरीरातली हार्मोन्स कमी-जास्त किंवा त्यात बदल होणे ह्यामुळे होत असते. आणि शरीरातील हार्मोन बदल प्रोटीनची मात्रा कमी होणे, अति प्रमाणात व्हिटॅमिन अ, काही वेळा जेनेटिक्स आणि गर्भ-निरोधक ह्यांचाही साईड इफेक्ट होउ शकतो.
- टक्कल पडण्याचा कालावधी: दररोज तर थोडे केस गळतच असतात. ह्याचे चक्र ४ महिन्याचे असते. आणि त्याचवेळी केसांचे गळणे सतत ४ महिन्यापर्यंत चालूच राहिले तर ते टक्कल पडण्याला जन्म देऊ शकते.
- टक्कल पडण्यावर काय उपाय करता येईल ? जर तुम्ही गर्भावस्था मध्ये असाल आणि ह्यावेळी खूप केस गळत असतील तर डॉक्टरांना भेटून घ्या. कारण जर हे हार्मोनल कारणामुळे होत असेल तर डॉक्टर त्यावर औषध देतील. आणि जर हे जर कोणत्या औषधाचा परिणामाने होत असेल तर त्या औषधी बंद करता येतील.
- चुकीचे खानपान, आहारातील असमतोल यामुळे केस गळतीत भर पडते. आहारात पोषक व खूप पौष्टिक तत्व असलेला आहार घ्या, जसे की मोड आलेली कडधान्ये, ताजी फळे, बटर, सुका मेवा आणि हिरवा भाजीपालाचा समावेश करा.
- मानसिक ताण-तणावाचा खूप परिणाम केसांवरती खूप पडत असतो. त्यासाठी चिंता, काळजी आणि टेन्शन घेण्याचे थांबवा. वाटल्यास त्यासाठी तुम्हाला ज्यावेळी असा तणाव वाटत असेल तेव्हा समजून घेणाऱ्या व्यक्तीशी बोलून घ्या. तुम्ही जर आनंदी आणि उत्साही राहायला लागलात तर केस आपोआप उगवायला लागतील.
या १० घरगुती उपायांनी केस पुन्हा वाढण्यास मदत होईल!
या समस्येवर काही फायदेशीर असे घरगुती उपाय आहेत. या उपायांमुळे केसगळती कमी होऊन केस पुन्हा वाढण्यास मदत होईल. हे सर्व पदार्थ आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असतात. त्यामुळे आपण ते सहज आजमावू शकतो. तर पाहुया कोणते आहेत हे उपाय…
खोबरेल तेल
खोबरेल तेल हलके गरम करा आणि केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मसाज करा. काही वेळाने केस धुवा. खोबरेल तेलामुळे केस स्वस्थ आणि मजबूत होतात.
एरंडेल तेल
टक्कल पडण्यावर एरंडेल तेल हा नैसर्गिक उपाय आहे. यामुळे नवीन केस येण्यास मदत होते. त्याचबरोबर डोक्यावर त्वचा (स्कॉल्फ) चे इंफेक्शनपासून संरक्षण होते.
दही
दही हे नैसर्गिक कंडीशनर आहे. याच्या वापरामुळे केसांची गळती कमी होते. दह्यातील प्रोटीन्समुळे केसांचे पोषण होते. त्यामुळे दही केसांच्या मुळांशी लावून १५ मिनिटे मालिश करा आणि अर्ध्या तासाने केस धुवा.
कोरफड
कोरफडीचा गर केसांना लावल्यास त्याच्यातील इन्जाईम्सने केसांची रोमछिद्र ओपन होतात आणि केसगळती दूर होते.
काळीमिरीची पेस्ट बनवा. त्यात लिंबाचा रस घालून हे मिश्रण केसांना लावा. तासाभराने केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा केसांवर हा प्रयोग केल्याने नवे केस येण्यास सुरुवात होते.
मध
२ चमचे मध, १ चमचा दालचिनी पावडरमध्ये २ चमचे ऑलिव्ह ऑईल गरम करुन केसांना लावा. २० मिनिटांनी केस धुवा.
लिंबू
१ चमचा लिंबाचा रस २ चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळून केसांना लावल्याने फायदा होईल.
कांदा
कांद्याचा रस केसांना लावले अत्यंत फायदेशीर ठरते. कांद्याच्या रसामुळे केसांतील बॅक्टेरीया आणि फंगस नष्ट होते. कांद्याचे तुकडे करुन केसांवर १२-१५ मिनिटे घासल्यास केस लवकर येण्यास मदत होईल.
कापूर
कापूरमुळे केसांतील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि डोक्याला थंडावा मिळतो. अर्धा लिटर खोबरेल तेलात १० ग्रॅम कापूर मिसळून केसांना नियमित लावल्यास केस वाढू लागतात.
मेथी
मेथीचे दाणे वाटून त्याची पेस्ट बनवा. ती पेस्ट स्कॉल्फवर लावा. तासाभराने केस धुवा. हा प्रयोग रोज केल्यास केस पुन्हा वाढीस लागतील.