एअर कंडिशनरची हवा खाताय!!! आपणांस माहीत आहे का ‘हे’ नुकसान होऊ शकते
हॅलो आरोग्य ऑनलाईन : भारत देश हा उष्ण कटिबंधात असल्याकारणाने आपल्याकडे मार्च महिन्यापासून उन्हाळ्याला सुरवात होते. जसा जसा उन्हाळा वाढू लागतो तस तसे आपण स्वतःला थंड ठेवण्यासाठी प्रयत्न करू लागतो. पंखे, एअर कूलर , A.C या प्रकारच्या साधनांचा वापर आपण कूल राहण्यासाठी करतो. कधी कधी दमट हवेमुळे आणि जास्त उष्णतेने पंखा लावून पण काहीच फायदा होत नाही. मग मात्र लोक या दिवसांत A.C वापरास प्राधान्य देतात. ऑफिसेस मध्ये A.C असतो. कारमध्ये A.C असतोच आणि आता घरगुती वापर हि मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कमी पॉवर वापरणारे ५ स्टार A.C वाजवी दरात मिळतात. मोठमोठ्या शहरांमध्ये जिथे ताजी हवा मिळणे अशक्यप्राय असते त्याठिकाणी A.C हमखास दिसतो. याचा परिणाम म्हणून सगळीकडे A.C ची चौकोनी खोकी घराबाहेर दिसू लागली आहेत.
एअर कंडिशनर चे फायदे:
- दम्याचा त्रास कमी होण्याची शक्यता.
- डिहायड्रेशनचा धोका कमी करते.
- मानसिक आरोग्य सुधारते त्यामुळे मन प्रसन्न राहून कामाचा परफॉर्मन्स वाढतो.
- चांगली झोप.
- हवेतील प्रदूषित घटकांपासुन बचाव.
- उष्माघात आदि उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव.
आपल्याला कदाचित माहित नसेल, AC मध्ये सतत राहिल्या मुळे आपल्याला याचे खूप दुष्परिणाम होतात. बऱ्याच प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.
सतत AC मध्ये काम करण्याचे नुकसान
आपण जेंव्हा AC रूम मध्ये काम करतो तेंव्हा आपल्याला बाहेरील तापमाना बद्दल माहिती नसते. AC रूम मध्ये बाहेरील हवा आत येत नाही, दरवाजे बंद ठेवावे लागतात. ज्यामुळे आपल्या शरीराला नैसर्गिक हवा मिळत नाही. जेंव्हा आपण AC रूम मधून बाहेर पडतो तेंव्हा बाहेरील तापमान वेगळे असते. या बदलेल्या तापमानामुळे आपल्याला सर्दी, खोकला, ताप होऊ शकतो.
AC चा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर होतो, ज्या मुळे जास्त डोकेदुखी होते. AC मध्ये सतत काम केल्याने रक्ताभिसरण वाढते. म्हणजे आपल्या शरीरात जे रक्त वाहते त्याच्या गतीत अंतर पडतो. ज्यामुळे स्नायू मध्ये ताण पडतो, तसेच आपले डोके जड जड वाटते आणि कमजोरी वाटते व आळसपण वाढतो.
जे लोक सतत AC मध्ये असतात त्यांना AC ची सवय लागते व त्यांना त्वचे संबंधी समस्या होतात. जसे त्वचा शुष्क व डेड स्कीन सेल्स सारख्या समस्या होतात. AC ची थंड हवा यासाठी कारणीभूत असते. AC च्या थंड हवे मुळे शुद्ध ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे आपली त्वचा कोमेजते. त्वचे सोबत केसांच्या देखील समस्या होतात. आणि आपले केस पांढरे व्हायला लागतात. तसेच आपल्याला त्वचे संबंधी रोग होतात. सतत AC मध्ये काम करणे हे आपल्या केसांसाठी व त्वचे साठी हानीकारक आहे.
जर आपण contact लेन्स वापरात असाल तर आपल्याला डॉक्टर ने AC मध्ये जास्त वेळ काम करण्यास मनाई केली असेल. कारण अशावेळी डोळे दुखायला लागतात, कारण सतत AC मध्ये काम करण्यामुळे contact लेन्स आपल्या डोळ्यांना चिकटतात. ज्यामुळे डोळ्यात आग होते आणि यामुळे डोळ्यातून पाणी येतो व इतर डोळ्यांच्या समस्या होतात. डोळे लाल होणे, डोळे दुखणे म्हणून AC मध्ये जास्त काळ राहु नका.
जर आपण सांधे दुखी पासून ग्रस्त असाल तर याचे कारण आपल्या शरीराचे तापमान असू शकत. शरीरात योग्य मात्रेत उष्णता असणे आवश्यक असते. सतत AC च्या थंड हवेमुळे आपल्या शरीराच्या तापमानावर याचा परिणाम पडतो यामुळे आपल्याला सांधे दुखी सारख्या समस्या होतात. आपली हाडे आखडतात, जास्त करून सांधे दुखतात. हे आपल्याला सामान्य वाटत असेल पण बऱ्याच वेळा हे आजार गंभीर रूप धारण करतात व आपल्याला संधिवात देखील होऊ शकतो. खास करून वृद्ध माणसांना AC मध्ये सतत राहणे धोकादायक आहे. AC ची थंड हवा आपल्या शरीरातील रक्ताला प्रभावित करते यामुळे हृदयाला आपले काम करायला अडथळे येतात. यामुळे हृदयाच्या समस्या वाढतात. म्हणून AC मध्ये सतत राहू नये.
आपल्या एअर कंडिशनर चे तापमान २४ अंश सेल्सिअस पेक्षा कधीच कमी करू नये. योग्य आणि प्रमाणात A.C वापर केल्यास बऱ्याच प्रमाणात त्याच्या दुष्परिणामांपासून वाचता येऊ शकेल.