बायो बबल म्हणजे काय? आईपीएल 2021 रद्द होण्यामागे ‘हि’ आहेत कारणे
हॅलो आरोग्य ऑनलाईन : नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार आईपीएल 2021 स्पर्धा कोरोनाच्या प्रकोपामुळे रद्द करण्यात आली आहे. या स्पर्धेदरम्यान अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून आईपीएल 2021 स्पर्धाच रद्द झाली. आईपीएल मधील सर्व संघाचे खेळाडू हे बायो बबल (bio-bubble) मध्ये असताना सुद्धा कोरोना संक्रमित झाल्यामुळे या बायो बबल वरच अनेक प्रश्न उठू लागले आहेत. कारण याच प्रकारच्या बायो बबल मध्ये गतवर्षीची आईपीएल स्पर्धेचा १३ वा सिझन यूएई मध्ये यशस्वी रित्या पार पाडला होता. परंतु एवढी हाय फाय सिक्युरिटी असताना पण बायो बबल चा फुगा कसा फुटला आणि त्यामुळे आईपीएल 2021 स्पर्धा का रद्द करावी लागली? नेमकी कुठे चूक झाली? पण आपल्या मनात प्रश्न निर्माण होत आहे कि बायो बबल म्हणजे काय? आणि खेळाडू यामध्ये कसे सुरक्षित राहतात.
काय आहे हा बायो-बबल?
तुम्हाला टेलिव्हिजन वरील बिग बॉस हा कार्यक्रम माहीत आहे ना. मग अगदी सेम टू सेम तसेच सर्व खेळाडू आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफ ला अश्याच अदृश्य नजरकैदेत ठेवले जाते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, हे असे वातावरण आहे ज्यामध्ये बाह्य जगात राहणाऱ्या लोकांचा कोणताही संपर्क राहत नाही, त्यात ठेवलेले लोक बाह्य जगापासून पूर्णपणे लांब राहतात. इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये सहभागी सर्व खेळाडू, प्रशिक्षक व सहाय्यक कर्मचारी, सामनाधिकारी, हॉटेल कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाते, त्यानंतर प्रत्येकाला बायो बबलमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जाते. एकदा आपण त्यात गेल्यावर कोरोना टेस्ट करणार्या वैद्यकीय टीमलाही बाहेर जाऊ दिले नाही. या मंडळामध्ये अशा लोकांचा समावेश आहे ज्यांची कोरोना चाचणी झाली आहे आणि ते संसर्गापासून पूर्णपणे दूर आहेत. या मंडळामध्ये राहणारे लोक बाह्य जगापासून दूर आहेत. म्हणजेच एक संलग्नक ज्यामध्ये येथे राहण्याची परवानगी मिळाल्यानंतर फक्त तेच लोक तिथे राहतात.
बायो-बबल कसा बनवला जातो?
दुबईत येणार्या संघांची प्रक्रिया 20 ऑगस्टनंतरच सुरू झाली. आयपीएलमध्ये भाग घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचाऱ्यांची दुबईला जाण्यापूर्वी दोनदा कोरोना चाचणी करण्यात आली होती. दुबईमध्ये नियमांनुसार प्रत्येकाला सात दिवस क्वारन्टीन ठेवले होते. या काळात, तीन वेळा कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच प्रत्येकास बबलमध्ये समाविष्ट केले गेले. बबलमध्ये समाविष्ट असलेल्यांना फक्त मैदान आणि हॉटेलमध्येच राहण्याची परवानगी आहे. केवळ बबलच्या आत असलेलेच त्यांना भेटू शकतात. स्पर्धेदरम्यान चाहत्यांना मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही. संघातील सदस्यांसाठी आणि सामना प्रसारित करणार्या उर्वरित कर्मचार्यांसाठी स्वतंत्र बबल तयार करण्यात आला आहे. स्पर्धा संपेपर्यंत बबलमधील सर्व लोकांना बाहेर जाऊ दिले जाणार नाही. विशेष परिस्थितीत, बाहेर जाणाऱ्यांना बबलकडे परत जाण्यापूर्वी त्यांना क्वारन्टीन ठेवणे आवश्यक आहे.
बायो-बबल तोडल्यास काय होईल?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) क्रिकेट बायो बबल नियम तोडेल तो आयपीएलची आचारसंहिता भंग केल्याबद्दल दोषी मानला जाईल आणि त्याअंतर्गत शिक्षा दिली जाईल. जर एखादा खेळाडू बायो-बबलच्या बाहेर गेला तर त्याला काही सामन्यांना बंदी घातली जाऊ शकते. नियम मोडल्यास खेळाडूला संपूर्ण स्पर्धेचा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा गमवावा लागू शकतो.
ट्रैकिंग डिवाइसद्वारे ठेवली जाते नजर
खेळाडूंच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यासाठी एक GPS ट्रैकिंग डिवाइस मदत घेतली जाते. हा डिवाइस खेळाडूंना आपल्या मनगटावर बांधणे बंधनकारक असते. यामुळे कोणता खेळाडू आत आहे किंवा बाहेर यावर नजर ठेवली जाते.
यूएई मध्ये सफलतापूर्वक सांगता झाली होती – आईपीएल 2020 मध्ये ट्रेकिंग डिवाइस आणि बायो बबल ची जबाबदारी रेस्ट्रेटा (Restrata) या प्रोफेशनल कंपनी ने पार पाडली होती. परंतु यावर्षी भारतात हि जबाबदारी स्थानिक हॉस्पिटल आणि परीक्षण प्रयोगशाळांच्या हातात हे काम सोपवले होते. जे काम रेस्ट्रेटा कंपनीने जबाबदारी पार पडले ते काम भारतात पूर्ण होऊ शकले नाही परिणामतः बायो बबल फुटून गेला.
नक्की काय झाले?
कोलकाता नाइट राइडर्स चा दुखापतग्रस्त खेळाडू वरुण चक्रवर्ती आपल्या खांद्याचे स्कॅन करण्यासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल झाला होता. त्याच दरम्यान वरुण संक्रमित झाल्याची शंका निर्माण झाली आहे. त्यामुळेच बायो बबल ची सुरक्षितता धोक्यात आली. KKR चे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर संक्रमित झाले. त्याचवेळी CSK चे वॉलिंग कोच लक्ष्मीपति बालाजी आणि सपोर्टींग स्टाफ मधील दोघे जण संक्रमित झाले. सनराइजर्स हैदराबाद चे रिद्धिमान साहा आणि दिल्ली कैपिटल्स चे अमित मिश्रा यांचे रिपोर्ट पण पॉझिटिव्ह आले.
एकंदरीत वरील घडामोडी पाहून खेळाडूंच्या जीविताच्या दृष्टिकोनातून न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला स्पर्धा थांबवण्याचे आदेश दिले त्यामुळे यावर्षीच्या आईपीएल 2021 चा शेवट अनपेक्षित झाला