|

साबुदाणा खिचडी आवडते का? साबुदाण्याच्या सेवनाने होतात ‘हे’ लाभकारी फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन: उपवासाला सर्वात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर काही येत असेल तर तो पदार्थ म्हणजे साबुदाणा. साबुदाण्याची खीर आणि खिचडी या साबुदाण्याच्या पदार्थाचा सर्वांनीच स्वाद घेतला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? उपवासाच्या दिवसात खाल्ला जाणारा हा साबुदाणा आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. आपण या लेखातून साबुदाण्याचा फायदे, उपयोग आणि नुकसान काय होऊ शकतं ते पाहणार आहोत. पण त्याआधी नक्की साबुदाणा म्हणजे काय आणि त्याची पोषक तत्व काय आहेत ते पाहूया –

साबुदाण्याचे पोषक तत्व (Nutritional Value Of Sabudana)

साबुदाण्यामध्ये अनेक पोषक तत्व आहेत. याबद्दल आपण जाणून घेऊया. साबुदाण्यामध्ये 10.99 ग्रॅम पाण्याचा समावेश असतो. तर 358 इतकी कॅलरी यामध्ये असते. याशिवाय यातून प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेटदेखील आपल्या शरीराला मिळतं. यामध्ये साखरेचं प्रमाण 3.35 ग्रॅम इतकं असतं. जर मिनरल्सबाबत जाणून घ्यायचं झालं तर साबुदाण्यात 20 मिलिग्रॅम कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॉपर, सेलेनियमचं प्रमाणही असतं. जे आपल्या शरीराला आवश्यक असतं. याशिवाय आपल्या शरीराला उपयुक्त ठरणारं विटामिन – 6 देखील साबुदाण्यामध्ये आढळतं. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारी अनेक पोषक तत्व यामध्ये अंतर्भूत आहेत. ज्याचा शरीराला फायदा होतो आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहातं. या पोषक तत्वामुळे आपल्याला नक्की काय फायदे मिळतात हे आपण पाहूया.

साबुदाणा खाण्याचे फायदे (Benefits of Sabudana In Marathi)

साबुदाण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. साबुदाण्याचं सेवन हे स्वास्थ्यवर्धक मानलं गेलं आहे. आपल्या आरोग्यासाठी नक्की कशा प्रकारे साबुदाणा खाण्याचे फायदे होतो हे आपण बघूया.

वजन वाढवण्यासाठी साबुदाण्याचा फायदा (Benefits Of Sabudana For Weight Gain)

तुम्ही अतिशय बारीक असाल आणि तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर साबुदाण्याचं सेवन तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. साबुदाण्याचा तुम्ही तुमच्या जेवणात समावेश करून वजन वाढवण्यासाठी उपयोग करून घेऊ शकता. साबुदाण्यात जास्त प्रमाणात कॅलरी आणि कार्बोहायड्रेट असतं. कॅलरी आणि कार्बोहायड्रेटच्या दोन्हीच्या सेवनाने वजन वाढण्यास मदत होते. कारण या दोन्ही गोष्टी शरीरातील उर्जा वाढवण्याचं काम करून फॅट वाढण्यासाठीही मदत करतात.

उष्णतेचा बचाव करण्यासाठी साबुदाण्याचा उपयोग (Use Of Sabudana To Protect From Heat)

व्यायामादरम्यान आपलं शरीर अतिरिक्त ऊर्जा स्वरूपात ग्लायकोजन (चरबी)चा उपयोग करत असतं. यामुळे आपल्या शरीरातील उष्णता वाढू लागते. त्यावेळी साबुदाण्याचं सेवन आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं. यामध्ये आढळणारं कार्बोहायड्रेट शरीरातील मेटाबॉलिज स्तराची पातळी संतुलित ठेवतं आणि ग्लुकोज स्वरूपात शरीराला ऊर्जा मिळवून देण्यास मदत करतं. ज्यामुळे ग्लायकोजन कमी वापरलं जातं. यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत मिळते. बऱ्याचदा साबुदाण्यापासून बनलेला खाद्यपदार्थांचा उपयोग खेळाडूंची वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी करण्यात येतो आणि ऊर्जा वाढवण्यात फायदेशीर ठरतो.

हाडांसाठी साबुदाणा खाण्याचे फायदे (Sabudana For Bones)

तुमची हाडं कमजोर असतील तर साबुदाणा तुमची हाडं मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरतो. साबुदाण्यात कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियमची चांगलं प्रमाण असतं. एका बाजूला कॅल्शियम तुमच्या हाडांचा विकास करण्यास फायदेशीर ठरतं. तर दुसऱ्या बाजूला लोह ऑस्टियोपोरोसिस सारखे हाडांचे विकार दूर करण्यासाठी मदत करतं. तसंच मॅग्नेशियम हाडांना तुटण्यापासून वाचवतं आणि अनेक समस्यांपासून लढण्यासाठीही शक्ती मिळवून देतं.

कॅलरीज आणि प्रोटीनसाठी (Calories and Protein)

तुम्ही काम करताना पटकन थकता का आणि तुमच्या शरीरात तुम्हाला ऊर्जेची कमतरता भासते का? असं असेल तर तुम्हाला साबुदाण्याचं सेवन करण्याची आवश्यकता आहे. साबुदाणा केवळ तुम्हाला ऊर्जाच मिळवून देतो असं नाही तर तुम्हाला जास्त वेळ काम करण्यासाठीही ताकद मिळवून देतो. यामध्ये ऊर्जा, कॅलरी आणि प्रोटीनचं प्रमाण आढळतं आणि त्यामुळे थकवा निघून जातो. यामधील प्रोटीन तुमच्या शरीरातील मसल्सना मजबूत करतात आणि त्यामुळे तुम्ही थकव्याशिवाय काम करू शकता. तसंच यामध्ये आढळणारे कार्बोहायड्रेट हे ऊर्जेचं अप्रतिम स्रोत आहे. यामुळे आपल्या शरीराला जास्त वेळ काम करण्याची ताकद मिळते.

उच्च रक्तदाब असणाऱ्या रूग्णासाठी (High Blood Pressure Patients)

उच्च रक्तदाबाची समस्या दूर करण्यासाठी साबुदाणा फायदेशीर ठरतो. यामध्ये असणारं फायबर, पोटॅशियम आणि फॉस्फोरस हे तुमच्या वाढत्या रक्तदाबाला नियंत्रित आणण्यासाठी मदत करतं. तसंच फॉस्फोरसमुळे लो ब्लड प्रेशरचा त्रास होतो. पण उच्च रक्तदाबासाठी हे फायदेशीर ठरतं. त्याशिवाय साबुदाण्यातील पोटॅशियम हृदरोगींची समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरून उच्च रक्तदाबाची समस्या दूर करण्यासाठी मदत करतं.

एनिमियाकरिता साबुदाणा फायदेशीर (Benefits Of Sabudana For)

नेहमी थकवा, कमजोरी आणि छातीत कळ येत असेल तर हे एनिमियाचं लक्षण आहे. शरीरातील आढळणाऱ्या लाल पेशींची कमतरता आणि कमजोरीमुळे लोह कमी असल्याने एनिमिया आजार होतो. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला साबुदाण्याचा फायदा करून घेता येतो. साबुदाणा या आजारावर उत्तम उपाय आहे. साबुदाण्यात लोह जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे आतड्यांना योग्य ऑक्सिजन मिळून पूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचं काम साबुदाणा करतो. यामुळे एनिमिया आणि यापासून होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळते.

मेंदूसाठी होतो फायदा (Sabudana For Brain)

साबुदाणा केवळ शरीरासाठी नाही तर आपल्या मेंदूसाठीही फायदेशीर ठरतो. यामध्ये मेंदूशी निगडीत असणाऱ्या अनेक त्रासातून सुटका मिळवण्याचे गुण असतात. यामध्ये फोलेटचं प्रमाण असतं. फोलेट हे प्रत्येक वयाच्या व्यक्तींच्या मेंदूसाठी फायदेशीर असते. हे मेंदूच्या विकारांसह इतर आजार दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. तसंच मेंदूचा विकास होण्यासाठी याचा फायदा करून घेता येतो.

रक्ताभिसरण सुरळीत करण्यासाठी (Blood Circulation)

रक्ताभिसरण चांगलं करण्यासाठी साबुदाण्याचं सेवन करणं योग्य आहे. यामध्ये असणारं फोलेट तुमच्या रक्ताभिसरणाची प्रणाली सुदृढ करण्यासाठी सक्षम करतं. तसंच फोलेट अर्थात फोलिक ऍसिड हे रक्त वाहिन्यांना आराम देण्यासह रक्तप्रवाह अधिक सक्षम करतं. तुम्हाला कोणताही हृदयाचा त्रास असेल तर तो यामुळे कमी होतो. तसंच हृदयरोगापासून दूर ठेवण्यास फायदेशीर ठरतं.

पचनक्रिया सुधारण्यासाठी (Improves Digestion)

तुम्हाला पचनक्रियेसंबंधी कोणतीही समस्या असेल तर तुम्ही साबुदाण्यावर नक्कीच विश्वास ठेऊ शकता. साबुदाण्यातील फायबर आणि प्रोटीन हे पचनक्रियेच्या प्रणालीला अधिक चांगलं करण्यासाठी मदत करतं. फायबर हे आपल्या शरीरातील साचलेला मळ काढून टाकण्यास आणि बद्धकोष्ठसारखा आजार दूर करण्यास मदत करतं.

त्वचेसाठी अप्रतिम ठरतो साबुदाणा (Sabudana For Skin)

जेव्हा आपण संपूर्ण आरोग्याबद्दल बोलतो तेव्हा आपल्या त्वचेकडे आपण कसं दुर्लक्ष करू शकतो. साबुदाणा आपल्या त्वचेसाठीही उत्तम ठरतो. यामध्ये जिंक, कॉप आणि सेलेनियमचं प्रमाण असतं. त्वचेसाठी या तिनही गोष्टी फायदेशीर असतात. जिंक सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेची सुरक्षा करतं. तर कॉपरमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स गुण हे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. तसंच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते त्यापासूनही साबुदाण्याच्या सेवनामुळे रक्षण होतं.

साबुदाण्याचे नुकसान (Side Effects Of Sabudana)

साबुदाणा नक्कीच आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. पण जेव्हा याचं प्रमाण जास्त होतं तेव्हा आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे नक्की काय नुकसान होतं ते पाहूया –

  • साबुदाण्यात कार्बोहायड्रेट उच्च प्रमाणात असतं. त्यामुळे याचं जास्त सेवन हे तुम्हाला मधुमेहाचा आजार देऊ शकतं
  • यामध्ये कॅलरीचं चांगलं प्रमाण असतं, जे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. पण याचं अधिक सेवन केल्यास, तुम्हाला लठ्ठपणासारखे आजारही होतात. त्याचप्रमाणे मधुमेह, रक्तदाबाची समस्या, मुतखडा आणि कॅन्सरसारखे आजार होण्याचीही शक्यता असते
  • यातील कॅल्शियमुळे हाडांच्या समस्येप्रमाणेच मुतखड्याचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे अतिसेवन करणं टाळा
  • याशिवाय श्वास घेण्यास त्रास होणं, छातीत जळजळ, उलटी, रक्ताचा विकार,  डोकेदुखी आणि थायरॉईडसारखे आजारही साबुदाण्याच्या अतिसेवनाने होतात.