कोरोनाच्या कहरात ग्रीन फंगसची भर; काय आहे ग्रीन फंगस? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन। कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान अनेकांमध्ये पोस्ट कोवीडची काही लक्षणे आंधळी आहेत. दरम्यान यामुळेच का काय कोरोनावर मात केलेले असंख्य जण ब्लॅक, यल्लो आणि व्हाईट फंगससारख्या गंभीर समस्यांना सामोरे जात आहेत. यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी काहीशी परिस्थिती उदभवलेली आहे. हे सर कमी का काय ? म्हणून आता ग्रीन फंगस या नव्या आजाराने आपला झेंडा उभारला आहे. इतकेच नव्हे तर मध्य- प्रदेशमधील इंदूर या ठिकाणी ग्रीन फंगसचा पहिला रुग्णदेखील आढळला आहे. यामुळे पुन्हा एका नव्या आजाराने लोकांच्या चिंतेत वाढ केली आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ग्रीन फंगस नेमके काय आहे? त्याची प्रमुख लक्षणे कोणती? आणि त्यावर कसे नियंत्रण मिळवता येईल हे सांगणार आहोत.
* ग्रीन फंगस म्हणजे नेमकं काय ?
ग्रीन फंगस म्हणजेच एस्परगिलोसिस इंफेक्शन. हे एक दुर्मिळ इंफेक्शन आहे. जे फंगस अर्थात बुरशीचा एक भाग आहे. यालाच वैद्यकीय भाषेत एस्परगिलस असे म्हणतात. या विषाणूची लागण कुठेही आणि कशीही होऊ शकते. कारण हा विषाणू श्वसनप्रक्रियेद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. सध्या कोविड १९ च्या विषाणूवर मात केलेल्या लोकांमध्ये याची लक्षणे आढळून येत आहेत. वजन कमी असणे किंवा शरीरातील थकवा वा अशक्तपणा यामुळे याची लागण होऊ शकते. तसेच एस्परगिलोसिस व्यतिरिक्त कॅंडिडा, क्रिप्टोकोकस, हिस्टोप्लास्मोसिस आणि कोक्सीडियोडो मायकोसिस असे फंगसचे अनेक प्रकार आहेत. त्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींना म्युकोरमायकोसिस, कॅडिडा आणि एस्परगिलोसिस या फंगसची लागण लवकर होऊ शकते”, अशी माहितीत एम्स रुग्णालयातील डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे.
* ग्रीन फंगसची लक्षणे :- अचानक ताप येणे, छातीत दुखणे, खोकला, खोकतेवेळी रक्त पडणे, श्वसनास त्रास होणे, नाकातून रक्त येणे, वजन कमी होणे, अशक्तपणा, शारीरिक थकवा, डोकेदुखी, हात पाय गळणे.
* ग्रीन फंगसवर नियंत्रण आणण्यासाठी करावयाचे उपाय :- मुळात कोणत्याही विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण स्वच्छतेचा अवलंब करणे गरजेचे आहे.
– शारीरिक स्वच्छता बाळगणे.
– धूळ, माती, प्रदुषण आणि दुषित पाणी अशा ठिकाणी जाणे वा वावरणे टाळा.
– मास्कचा नित्य नियमाने सतत वापर करणे आणि मास्क खराब होताच दुसरा मास्क वापरणे. (एक मास्क १-२ दिवसापेक्षा जास्त काळ वापरणे टाळा)
– आपले हात, पाय आणि चेहरा कायम स्वच्छ पाण्याने धुणे.