| | |

उच्च वा कमी रक्तदाबाची समस्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर; जाणून घ्या परिणाम आणि उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल दर दोन व्यक्तींमागे एका व्यक्तीस उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे निदर्शनास आले आहे. उच्च रक्तदाबासह कमी रक्तदाबाचा त्रास देखील अनेकांना जाणवतो. मात्र लोक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. परंतु, रक्तदाब कमी होणे हि बाब आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. कारण जेव्हा रक्तदाब ८० ते १२० या दरम्यान असतो तेव्हा तो सर्व सामान्य समजला जातो. मात्र तोच जर ६० ते ९० या दरम्यान असेल तर त्यास हायपर टेंशन किंवा कमी रक्तदाब अर्थात लो ब्लड प्रेशर असे म्हणतात.

तज्ञांच्या अभ्यासानुसार, रक्तदाब उच्च असल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. तर रक्तदाब कमी झाल्याने थेट आपल्या अवयवांवर गंभीर परिणाम होतो. शिवाय या दोन्ही समस्यांमुळे मेंदू, हृदय, फुफ्फुसे, किडनीच्या समस्यांसह रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात होण्याकरिताही अडचण निर्माण होते. यामुळे अवयवांमधील कार्यक्षमता कमी होते. शिवाय यामुळे हृदय विकाराचा आणि ब्रेनस्ट्रोकचा धोका वाढतो. यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत कि वैद्यकीय उपचारांसोबत आपण कोणते घरगुती उपचार केले असता या समस्येपासून आराम मिळवता येईल.

१) दैनंदिन आहाराचे छोटे भाग – सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण जर आहाराची अशी दिनचर्या असेल तर लगेच बदल करा. आपले संपूर्ण जेवण हे ५ ते ८ भागांतमध्ये विभागून थोड्या थोड्या वेळाने अन्न ग्रहण करा. यामुळे रक्तदाब कमी होत नाही. शिवाय ही पध्दत तुम्ही मधुमेह नियंत्रित करण्यासाठीही वापरू शकता.

२) मीठाचे सेवन – दैनंदिन आहारात अति मीठ किंवा खारट पदार्थ खाण्याची सवय उच्च रक्तदाबाच्या समस्येला उभारी देतात. त्यामुळे रक्त दाब कमी असणार्‍यांनीही मीठ खाण्यावर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचे आहे. दिवसाला २ ते ३ mg पेक्षा भासत मीठ घाणे आरोग्यास घटक ठरू शकते.

३) योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन – दिवसभरात किमान २ ते ३ लीटर पाणी प्यावे. या व्यतिरिक्त नारळ पाणी, बेलाचे सरबत, कैरी पन्हे, लिंबू पाणी यापैकी कोणत्याही द्रव्याचे प्रमाणात सेवन करणे लाभदायक असते.

४) ब्लॅक कॉफी – ब्लॅक कॉफी हे पेय रक्तदाब संतुलित ठेवते यामुळे शारीरिक यंत्रणांमध्ये सुधार होते.

५) तुळशीचे पान – तुळशीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमीन सी असे पोषक घटक असतात. हे रक्तदाब स्थिर ठेवण्याकरिता मदत करतात. त्यामुळे दररोज उपाशी पोटी तुळशीची ५ ते ६ पाने स्वच्छ धुवून चावून खावीत. यामुळे देखील त्वरित आराम मिळू शकेल.

६) बदाम दूध – रात्री झोपण्यापूर्वी ४ ते ५ बदाम पाण्यात भिजवून ठेवा. यानंतर सकाळी ते पाण्यात उकळून घ्या आणि हे पाणी थंड झाल्यावर बदाम किसून त्यासकट ग्रहण करा. यामुळेदेखील रक्दाब नियंत्रित राहतो.

७) काळे मनुका – काळे मनुका ५ ते ७ असे रात्रभर पाण्यात भिजून ठेवा. यानंतर सकाळी ते खा. यामुळे उच्च अथवा कमी रक्तदाबाचा त्रास होत नाही.