पावसाळ्याच्या ऋतूमध्ये त्वचेची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या खास ब्युटी टिप्स
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात मान्सून अर्थात पावसाळी ऋतूचे जोरदार आगमन झाले आहे. यामुळे महिनाभर गरमीने हैराण झालेल्या लोकांना पावसाच्या सरी तृप्त करू लागल्या आहेत. मात्र प्रत्येक ऋतू स्वत:सोबत वेगवेगळे आजार आणि समस्या घेऊन येतो. तसाच पावसाळासुद्धा त्वचेसंबंधित समस्या घेऊन येतो. या दरम्यान तुमची त्वचा पॅची दिसू शकते. तर चेहऱ्यावर मुरूम किंवा पुरळ होण्याची शक्यताही असते. पण आता काळजी करु नका. कारण आम्ही तुम्हाला आज अश्या काही टिप्स देणार आहोत ज्या तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी एकदम परफेक्ट आणि एकदम सोप्प्या आहेत. खालीलप्रमाणे :
१) पाणी प्या – मुख्य म्हणजे, कोणत्याही त्वचेसंबधित आजारावर ‘पाणी’ हे सर्वोत्तम औषध आहे. यामुळे ऋतू कोणताही असो मात्र दररोज दिवसभरात २ लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. जेणेकरुन चेहऱ्यावर मुरूम किंवा पुरळ येण्यापासून सुटका मिळते.
२) एक्सफोलिएट – क्लिन्जर – टोनर – मॉइश्चरायझर : या ब्युटी टीप्स म्हणजे सुंदर त्वचेचे रहस्य. सर्वात आधी तुमचा चेहरा एक्सफोलिएट म्हणजे स्वच्छ करुन घ्या. त्यानंतर क्लिन्जर वापरून कॉटनने पुसून घ्या. मग चेहऱ्यांवर आधी टोनर लावा. त्यानंतर १० मिनिटांनी मॉइश्चरायझर लावा.
३) सनस्क्रिनचा वापर – पावसाळ्यात सनस्क्रिन लावण्याची काय गरज? असे अनेकांना वाटते. ढगाळ वातावरणात तुमची त्वचा सुर्य किरणांपासून सुरक्षित आहे, असे नाही. त्यामुळे दररोज नियमितपणे सनस्क्रिन लावणे त्वचेसाठी फायदेशीर आहे.
४) घरगूती उपाय करा – आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी बाजारातील कॉस्मेटिक प्रॉडक्टऐवजी घरगुती उपायांचा अवलंब करा. यात तुम्ही स्वत: घरगूती स्क्रब, क्लिन्झर आणि टोनर तयार करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही मुलतानी मिट्टी, हळद आणि चण्याच्या पिठाचे घरच्या घरी फेसपॅक बनवून वापरू शकता.
५) मेकअप कमी वापरा – पावसात भिजल्याने मेकअप एकतर पूर्ण धुवून जातो नाहीतर तुरळक निघून जातो. यामुळे तुमची त्वचा पॅची दिसते. म्हणून मेकअपचा शक्य तितका कमी वापर करा. तरीही तुम्हाला मेकअप करायचा असेलच, तर वॉटरप्रुफ मेकअप तुम्ही वापरू शकता.