डेल्टा प्लस व्हेरियंट म्हणजे काय? जाणून घ्या परिणाम आणि घ्यावयाची खबरदारी
हॅलो आरोग्य ऑनलाईन। देशातील कोरोना विषाणूची दुसरी लाट खूप भयंकर आहे. या लाटेचा जास्त प्रभाव १८ वर्ष आणि ४५ वर्षावरील लोकांवर जास्त झाला आहे. या दुसऱ्या लाटेस + डेल्टा व्हेरियंट मोठे कारण असल्याचे सांगितले गेले आहे. पण डेल्टा + व्हेरियंट नक्की काय आहे? हे अद्याप लोकांना ठाऊक नाही. यावर अरबिंदो मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ. सुस्मित कोस्टा यांनी विश्लेषण केले आहे. त्यानुसार आपण जाणून घेऊयात डेल्टा + व्हेरियंट म्हणजे नक्की काय? त्याचा होणारा परिणाम आणि घ्यावयाची काळजी.
१) डेल्टा प्लस (+) व्हेरियंट म्हणजे काय आहे?
– आपण कोरोना विषाणूशी परिचित आहोतच. ते एक स्पाइक प्रोटीन आहे. जे शरीरात शिरून पेशींमध्ये संसर्ग पसरवते. ही या विषाणूची मूळ प्रवृत्ती सतत बदलत असते. प्रथम डेल्टा अल्फा B.1.617.1 यानंतर दुसरी लाट आली आणि यामध्ये डेल्टा व्हेरिएंट B.1.617.2 आढळले. जे अतिशय प्रभावी होते. तर आता एक नवीन म्युटेशन कोड व्हेरियंट 63 म्युटंटसह तयार होत आहे. ज्याचे नाव K 417n आहे. अर्थात डेल्टा + व्हेरियंट हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संकेत आहे. आजच्या काळात नवे व्हेरियंट ओळखण्यासाठी अधिकाधिक सिक्वेन्सिंग करण्याची गरज पडते. याच्या मदतीने लवकर निदान केले जाऊ शकते.
२) डेल्टा + व्हेरियंट ही तिसरी लाट?
– खरंतर हि एक शक्यता आहे. लसीकरणानंतर शरीर अँटीबॉडीज तयार करते. यामुळे जेव्हा एखादा आजार होतो तेव्हा आपण त्याच्याशी लढू शकतो. आपल्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज जर या नव्या वायरसवर काम करत नसतील तर ही तिसरी लाट असू शकते. यावर तूर्तास सखोल संशोधन सुरु आहे. म्हणून निश्चित सांगू शकत नाही की नवीन वायरसवर अँटीबॉडीज काम करत आहेत का नाही.
३) डेल्टा + व्हेरियंट शरीराच्या कोणत्या भागास संक्रमित करतो?
– हा वायरस थेट श्वसनमार्गावर परिणाम करतो आणि ओटीपोटात संक्रमण(जी आय ट्रेक)ला अधिक प्रभावित करतो.
४) लहान मुलांवर परिणाम होणार का?
– लहान मुलांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असते. जे म्युटेशन तयार होत असत त्याला मुलं स्वीकारतात. मात्र जर त्यांचे शरीर या नव्या व्हेरियंटचा अस्वीकार करत असतील तर हे त्यांच्यासाठी धोकादायक असू शकते. यावरही अद्याप संशोधन सुरु आहे. त्यामुळे निश्चित सांगता येणार नाही कि मुलांवर याचा किती प्रभाव असेल.
५) डेल्टा प्लस मध्ये काय खबरदारी घ्यावयाची आहे?
– मुळात असा विचार करणे थांबवा कि आता लस घेतली म्हणजे आपल्याला काहीही होणार नाही. सध्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर संशोधन सुरु आहे. अँटीबॉडी आपल्यामध्ये बनली आहे आणि अँटीजेन त्याच्यावर काम करत नसेल तर रिइन्फेक्ट होऊ शकतो. त्यामुळे मास्क लावा, सामाजिक अंतर राखा, हात साबणाचे वारंवार धुवा, अनावश्यक बाहेर फिरू नका. कारण कोविड हा एक अतिशय प्रभावी संसर्गजन्य रोग आहे. हा एकापासून दुसऱ्याकडे सहज जातो. ज्यांची प्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांना या आजाराची लागण लवकर लागते आणि ते त्यांच्या जीवावर बेतू शकत.