मूड स्विंग्सचा त्रास घालवून आनंदी राहण्यासाठी हे पदार्थ जरूर खा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। मूड स्विंग्सचा त्रास असा आहे जो हार्मोनल इम्बॅलन्समुले होत असतो. त्यामुळे हा त्रास कुणालाही कधीही होऊ शकतो. यात मूड बदलण्याचे अनेक पर्याय आहेत. फिरायला जाणे, मोकळी हवा खाणे, मित्र मैत्रिणींना भेटणे यानेही मूड चांगला होतो पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळं करणं फारच कठीण आहे. त्यामुळे सतत घराच्या चार भिंतीत राहणे आणि त्यात वर्क फ्रॉम होम यामुळे सतत चिडचिड होते. पण आता काळजी करू नका. आनंदी राहण्याचा मार्ग पोटातूनही जातो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अश्या पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे खाऊन तुमचा मूड आनंदी होईलच आणि त्याचसोबत मूड स्विंग्सचा त्रासही कमी होईल. तर मग जाणून घेऊ या.
१) ग्रीन टी – ग्रीन टी आरोग्यासाठी अत्यंत चांगला पर्याय आहे. कारण यात अँटीऑक्सिडंट्स आणि अमीनो ऍसिडने मुबलक प्रमाण असते. यामुळे ग्रीन टीचे सेवन मूड सुधारण्यास मदतयुक्त असते.
२) कॉफी – कॉफीमध्ये अधिक प्रमाणात कॅफिन असते. यामुळे जेव्हा मूड खराब असेल तेव्हा त्याचे सेवन करावे. मात्र मर्यादित प्रमाणात, कारण कॉफीचे जास्त सेवन निद्रानाशाचे मूळ होऊ शकते.
३) डार्क चॉकलेट – डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. जे ताण कमी करण्यास मदत करतात. यामुळे हे चॉकलेट खाल्ल्याने आनंदी राहण्याचे हार्मोन्स वाढतात. त्यामुळे जर का आपण नैराश्याने त्रस्त असाल तर डार्क चॉकलेट जरूर खा. शिवाय हे खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
४) ओट्स – ओट्स ग्लाइसेमिक इंडेक्स कमी करतात. यामुळे रक्त परिसंचरण चांगले होते. त्यामुळे मूड खराब असेल तर दुधात ओट्स मिसळून खा. यामुळे ओट्समधील उपस्थित खनिज सेलेनियम थायरॉईड ग्रंथीच्या मूडला नियंत्रित करतात आणि मूड स्विंगची समस्या दूर होते.
५) अक्रोड – ताणतणाव दूर करण्यासाठी हा सर्वोत्तम स्त्रोत आहे. अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स आणि मॅग्नेशियम असतात. यामुळे अक्रोडच्या सेवनाने सेरोटोनिनचे प्रमाण वाढते. यामुळे आनंदाची पातळी वाढते. या फायद्याकरिता दररोज सकाळी किमान २ अक्रोड खाणे आवश्यक आहे.
६) केळी – केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी ६, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे मुबलक प्रमाण असते. ते खाल्ल्याने मन प्रसन्न व आनंदी होते आणि मनःस्थिती सुधारते. सकाळी दुधासोबत एक केळ खाल्ल्याने अख्खा दिवसभर मूड चांगला राहतो.
७) रताळे – रताळे एक कंदफळ असून यात कार्बोहायड्रेट जास्त असतात. त्यामुळे हे खाल्ल्याने सेरॉटेनिनची पातळी वाढते आणि आपला मूड चांगला राहतो.