|

खसखस देते आरोग्यवर्धक फायदे; माहित नसतील तर जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। खसखस असा पदार्थ आहे जो मुख्य करून दिवाळीसारख्या सणसोहळ्यांना बनविल्या जाणाऱ्या पदार्थांसाठी लागतो. रव्यासारखा कणकण दिसणारा हा पदार्थ आकाराने लहान असला तरीही आपल्याला आरोग्यवर्धक बरेच फायदे देतो हे किती जण जाणतात? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला खसखसचे असे फायदे सांगणार आहोत जे सर्वांना माहित असणे आवश्यक आहे.

१) श्वसनाच्या समस्येमध्ये खसखस लाभदायी आहे. कारण ती खोकला कमी करून श्वसन समस्येमध्ये दीर्घकालीन आराम देण्यास मदत करते.

२) झोपेच्या समस्येमुळे त्रासलेल्यांनी झोपण्यापूर्वी खसखशीचे गरम दूध प्यायल्याने निद्रानाशाची समस्या दूर होते.

३) खसखस ​​मानसिक तणाव दूर करते. तसेच त्वचेवरील सुरकुत्या, मुरूम कमी करण्यासही मदत करते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स आढळतात. जे आपल्याला तरुण व तेजस्वी दिसण्याकरिता मदत करतात.

४) खसखस ​​त्वचेला ओलावा देण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे त्वचेची जळजळ आणि खाज कमी होते. शिवाय एक्झिमासारख्या रोगाशी सामना करण्यात मदतयुक्त ठरते.

५) तसेच त्वचा सुंदर करण्यासाठी खसखसचा फेसपॅक वापरला जातो. दुधामध्ये खसखस वाटून वापरले जाते. हे त्वचेला ओलावा प्रदान करून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणते.

६) खसखसमध्ये ओपियम अल्कलॉइड्स आढळतात. जे सर्व प्रकारच्या वेदना दूर करण्यात प्रभावी आहेत. विशेषतः हे स्नायूंच्या वेदनांमध्ये वापरले जाते.

७) किडनी स्टोन असणाऱ्यांना खसखस फायदेशीर आहे. खसखसमध्ये ऑक्सिलेट असतात. जे शरीरातील अतिरिक्त कॅल्शियम शोषून किडनीमध्ये स्टोन होण्यापासून प्रतिबंधित करते.

८) खसखसमध्ये ओमेगा ६ फॅटी ऍसिड्स, प्रोटीन आणि फायबर असते. शिवाय त्यात फायटो केमिकल्स, व्हिटॅमिन बी, थायमिन, कॅल्शियम आणि मॅंगनीज देखील आढळते. जे शरीराच्या आरोग्यासाठी पौष्टिकदृष्ट्या फायदेशीर असतात.

९) खसखसचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता होत नाही. शिवाय पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते.

१०) शिवाय खसखस शरीराच्या आरोग्याशी संबंधित लहान लहान समस्यांमध्ये आराम देते. उदाहरणार्थ – शरीरातील पाण्याची कमतरता, ताप येणे, सूज येणे, पोटात जळजळ