काजू खाल तर तंदुरुस्त रहाल; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आयुष्यात खूप पैसा असणे म्हणजे संपत्ती नव्हे तर निरोगी आरोग्य हि खरी संपत्ती. कारण आपले आरोग्य बहुत्तम असेल तर आपल्यात पैसे कमावण्याची ऊर्जा दुपट्टीने राहते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला निरोगी आयुष्याचे गुपित राखणाऱ्या काजूबद्दल सांगणार आहोत. आपल्या निरोगी आरोग्यासाठी काजू अत्यंत गुणकारी आहे. अगदी थोडयाश्या काजूचे सेवन देखील शरीराला उर्जा देऊन विविध आजारांपासून त्याचे रक्षण करतात. म्हणूनच जाणून घ्या काजूचे शारीरिक आरोग्याशी संबंधित फायदे. खालीलप्रमाणे:-
१) ऊर्जास्रोत – काजूला ऊर्जेचा उत्तम स्रोत म्हणून ओळखले जाते. कारण काजूचे सेवन केल्याने शरीराला बऱ्यापैकी शक्ती मिळते. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती काजूचे सेवन करू शकते..
२) स्मार्ट ब्रेन – काजूच्या सेवनाने मेंदूचे कार्य अधिक गतीने आणि सुरळीत होण्यास मदत होते. शिवाय काजू खाल्याने लहान मुलांच्या मेंदूची चांगली वाढ होते आणि त्यांची आकलन क्षमता (ग्रास्पिंग) देखील वाढते.
३) मायग्रेन – डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास असेल तर रोज सकाळी उपाशी पोटी ४ ते ५ काजू आणि त्यावर एक चमचा मध घ्या. यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होते.
४) मानसिक स्थैर्यता – काजूमुळे मेंदूतील सिरोटोनिनचे प्रमाण संतुलित होते यामुळे मानसिक स्थिती सुधारते.
५) स्मरणशक्ती व एकाग्रतेत वाढ – काजू खाल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. काजूत असणाऱ्या एनर्जीमुळे मायग्रेन व डोकेदुखीसारखे त्रास कालांतराने कमी होतात यामुळे मेंदूवरील ताण कमी होतो.
६) मूड्सविंग्स – काजूत आयर्न आणि ओमेगा ३चे प्रमाण जास्त असते. यामुळे मूड चांगला ठेवण्यासाठी काजू अधिक फायदेशीर आहे.
७) रक्तदाब नियंत्रण – काजूमध्ये हेल्थी फॅट्स असतात. शिवाय यात प्रोटीन आणि विटामिनचे प्रमाणदेखील जास्त असते. यामुळे काजू खाल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
८) रोगमुक्त पेशी – काजूतील पोषक तत्वांमुळे पेशीच्या डीएनएचे रक्षण होते आणि यामुळे अनेक पेशी निरोगी राहतात. परिणामी अत्याधिक विविध आजारांपासून मुक्तता मिळते.
९) कॅन्सरचा धोका कमी – काजूच्या सेवनाने कॅन्सरच्या पेशी शरीरात पसरत नाहीत. यामुळे लिव्हर कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर यांसारखे आजार होण्याचा धोका कमी होतो.
१०) निरोगी दात – काजूमध्ये एंटी ऑक्सिडेंट आणि मुबलक प्रमाणात कॅल्शिअम असते. यामुळे काजू दररोज खाल्ले तर हाडे मजबूत होतात. शिवाय दात व हिरड्याही सशक्त राहतात आणि दातांचे आरोग्य सुधारते.