दम्याचा त्रास कसा ओळखाल?; जाणून घ्या लक्षणे आणि औषधी
हॅलो आरोग्य ऑनलाईन। दम्याचा त्रास हा श्वसन क्रियेशी संबंधित आहे. श्वसनमार्गात औज येणे, चिकट द्रव्य साचणे, श्वसन नलिका कडक होणे या अश्या समस्या उध्दभवल्यास रुग्णाला श्वास घेण्यासंबंधित अडथळा जाणवतो. या त्रासालाच ‘दमा’ असे म्हणतात. मुख्य बाब अशी कि हा आजार कोणत्याही वयातील व्यक्तीला अगदी सहजरित्या होऊ शकतो. अगदी नवजात बालकांमध्येदेखील हा आजार होण्याची शक्यता असते. अनेकदा या आजाराची लक्षणे समोर असूनही आपल्याला समजत नाहीत आणि हा त्रास दिवसागणिक वाढतच जातो. चला तर जाणून घेऊयात दम्याच्या त्रासाची लक्षणे आणि उपाय.
- दम्याची सामान्य लक्षणे कोणती?
१) दिवसभर थकवा जाणवणे आणि सतत अस्वस्थता जाणवणे.
२) चालताना/ शारीरिक हालचाली करतेवेळी धाप लागणे.
३) श्वास सोडतेवेळी शिट्टीसारखा आवाज येणे.
४) छातीत घट्टपणा/ जडपणा येणे.
५) वारंवार खोकला येणे.
६) खोकल्यासह कफ साचणे आणि छातीत घुरघुरणे. - दम्यापासून संरक्षण कसे कराल?
– धूळ, माती, धूर, प्रदूषण असल्यास तोंड आणि नाक स्वच्छ कपड्याने झाका. तसेच धूम्रपान करू नका.
– ताजे पेंट्स, कीटक नाशके, फवारण्या, अगरबत्ती, डास मारण्याची कॉइल, सुगंधित परफ्यूम इत्यादींच्या गंधापासून दूर रहा.
– प्रिजर्वेटिव खाद्य पदार्थ, कोल्ड ड्रिंक इत्यादींचे सेवन टाळा.
– कृत्रिम रंग आणि फ्लेवर इसेन्सचा आहारातील वापर टाळा. - दम्याच्या रोगात प्रचलित आयुर्वेदिक औषधे:-
– कंटकारी अवलेह
– वासवलेह
– सितोपलादी चूर्ण
– कनकासव
– अगत्स्यहरीतिकी अवलेह - दम्याचा रोगात प्रभावी असणारी औषधी वनस्पती आणि त्यांचे फायदे –
१) यष्टीमधू/ जेठीमध – घसा स्वच्छ करण्यासाठी
२) कंटकारी – कंठशुद्धी व फुफ्फुसात साचलेल्या चिकट पदार्थांची स्वच्छता करण्यासाठी
३) वासा – संकुचित श्वसन नळ्या विस्तृत करण्यासाठी
४) पुष्करमूल – अँटीहिस्टामाइन सारखे काम करण्यासह अँटी बेक्टेरिअल गुणधर्म असणारी औषधी
- महत्वाची टीप :- यांपैकी कोणतेही औषध उपचारार्थ वापरण्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.