|

घरामध्ये मस्त आणि ऑफिसमध्ये सुस्त? मग या टिप्स जरुर वापरा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा असे होते कि आपण घरामध्ये अगदी निवांत आणि तणावमुक्त असतो. त्यामुळे शारीरिक अस्वस्थता जाणवत नाही. मात्र कार्यालयात दिवसातून ८ ते ९ तास सतत कामातील व्यग्रतेमुळे शरीर आणि मेंदू थकून जातो. परिणामी ऑफिसमध्ये गेल्यानंतर मन न लागणे किंवा शारीरिक अस्वस्थता आणि मानसिक ताण जाणवतो. त्यात कामाचा ढीग पाहून स्वतःला फिट ठेवण्याचा विचारही करायला आपल्याकडे वेळच उरत नाही.

अशामूळे ऑफिसमधील आपल्या आसपासचे वातावरण साहजिकच गढूळ होऊ लागते. त्यामुळे आपण आज अश्या काही टिप्स जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमचे मन ऑफिसमध्ये स्थिर राहील आणि ताणही जाणवणार नाही. मात्र या गोष्टी आपल्या नित्यक्रमात समाविष्ट करणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला याचा लाभ होऊ शकतो.
चला तर मग जाणून घेऊयात कार्यालयात काम करताना तंदुरस्त राहण्यासाठी काय करू शकतो ते.

– जर तुमचे ऑफिसमध्ये सतत बसून काम करणे असेल, तर कामातून अधे – मध्ये तिथल्या तिथे फिरण्याची सवय करून घ्या.

– आपल्या टेबलवरील अस्ताव्यस्त फाईल्स, रजिस्टर, पुस्तके, वर्तमानपत्रे इत्यादी स्वत: त्यांच्या योग्य ठिकाणी उचलून ठेवा.

– आपली केबिन असेल, तर आपल्या केबिनमध्ये हात वळवणे, फिरणे अश्या गोष्टी करा.

– ताजे तवाने वाटण्यासाठी केबिनमध्ये एअर फ्रेशनरचा वापर करा.

– कोणत्याही कारणाने किमान १५ ते २० मिनिटे नक्की चाला, म्हणजे शरीराचा व्यायाम होतो.

– घरगुती नाश्ता जो आरोग्याला पोषक असेल तो तितकाच चवदार असेल याची काळजी घ्या. हा नाश्ता कार्यालयात घेऊन जा आणि मधल्या वेळेत भूक लागल्यास खा.

– कणकेच्या खाऱ्या किंवा गोड मठर्‍या, चिवडा, भट्टीतले चणे इ. पदार्थ अधून मधून खा.

– आपण ऑफिस मीटिंगसाठी वारंवार बाहेर जात असाल, तर रेस्टॉरंटमध्ये जेवताना सलाड आणि सूप अधिक घ्या.

– तळलेले अन्न खाणे टाळा.

– उन्हाळ्यात थंड पेय घेताना ते जास्त रासायनिक नसेल याची काळजी घ्या. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गरम पेय प्या म्हणजे घसा खराब होणार नाही.

– काम करताना थकल्यासारखे वाटत असेल तर खुर्चीवरच १० मिनिट डोळे बंद करून शांतपणे बसून रहा.

– ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून जे व्यायाम करू शकता ते करत राहा.
उदा. हात, पाय, खांदा, मान आणि डोळ्यांचे व्यायाम बसतेवेळी करणे शक्य आहे. ते नक्कीच करा.