खडीसाखरेसोबत घ्या आरोग्याची काळजी; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। खडीसाखर हा साखरेचाच प्रकार आहे. जो ओबढधोबड आकाराच्या खडे स्वरूपात असतो. रिफाईंड साखरेपेक्षा अर्थात आपल्या रोजच्या वापरातील साखरेपेक्षा जरा कमी गोड असलेली खडी साखर आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. आपल्याला निरोगी राहायचं असेल तर खाडी साखर अत्यंत फायदेशीर आहे. शिवाय आयुर्वेद शास्त्रातील अनेक औषधांमध्ये खडीसाखरेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. रिफांईड साखर खाल्ल्याने आरोग्याचे बरेच नुकसान होते मात्र खडीसाखर खाण्यास काहीच हरकत नाही.कारण खडीसाखरेत रिफांईड साखरेपेक्षा अतिशय कमी कॅलरिज असतात.
आर्युवेदानुसार खडीसाखरचे गुणधर्म थंड असतो. शिवाय ती वात, पित्त, कफ यांचे संतुलन राखणारी आहे. तसेच खडीसाखरेमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अमिनो अॅसिड असतात. भाज्यांमध्ये अतिशय दुर्मिळ असलेले व्हिटॅमिन बी १२ खडीसाखरेतून अगदी सहज मिळू शकते. एका १५ ग्रॅंम खडीसाखरेतून शरीराला ६० कॅलरिज मिळतात. त्यामुळे मर्यादित प्रमाणात खडीसाखर उपयोगाची आहे. चला तर जाणून घेऊयात खडीसाखर खाण्याचे फायदे.
१) हिमोग्लोबिन वाढ – खडीसाखरेमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. यासाठी दूधातून खडीसाखर घेतल्याचा नक्कीच चांगला फायदा होईल. अशक्त लोकांनी नेहमी जवळ खडीसाखर ठेवावी.
२) पचनसंस्थेत सुधार – खडीसाखरेचा उपयोग अन्नाचे योग्य पचन व्हावे यासाठी करता येतो. यासाठी जेवणानंतर बडीसोप आणि खडीसाखर खाण्याची पद्धत वापरावी. त्यामुळे पचनसंस्था मजबूत होते. जेवणानंतर खडीसाखर खाण्याने अन्न लवकर पचते आणि अपचनाच्या समस्या कमी होतात.
३) नाकातून रक्त येण्यावर लाभ – खडीसाखरेमुळे नाकातून होणारा रक्तस्त्राव लगेच थांबतो. बऱ्याचदा अनेकांना नाकातून रक्त येण्याचा त्रास होतो. अशावेळी तोंडात एखादा खडीसाखरेचा खडा ठेवणे फायद्याचं ठरेल किंवा पाण्यात खडीसाखर टाकून ते पाणी पिण्याने फायदा होऊ शकतो.
४) वंधत्वावर उपाय – आयुर्वेदानुसार खडीसाखर ही शुक्राणूवर्धक आहे. ज्या जोडप्यांना बाळासाठी प्रयत्न करूनही गर्भ राहण्यास अपयश येत असेल त्यांनी खडीसाखरेचे पाणी नियमित पिण्यास फायदा होतो. गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असल्यास अक्रोड, केसर आणि खडीसाखर एकत्र करून खावी.
५) जुनाट खोकल्यावर रामबाण – सतत कफ अथवा खोकल्याचा त्रास असेल तर खडीसाखरेचे सेवन करा. खोकला सुरू झाल्यावर तोंडात खडीसाखरेचा तुकडा ठेवा. ज्यामुळे तुमचा खोकला थोडावेळ का होईना थांबेल. खडीसाखर चावून खाऊ नका. खडीसाखर फक्त तोंडात ठेवा. ज्यामुळे तुमचे घशाचे इनफेक्शन कमी होईल. शिवाय खडीसाखर आणि आल्याचा रस एकत्र करून घेतल्यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो.
६) श्वसनाच्या त्रासात फायदा – श्वसन सुधारण्यासाठी खडीसाखर खूपच गुणकारी आहे. काळी मिरी आणि मलईसोबत खडी साखर खाल्ल्याने दम्याचा अथवा श्वसनाचा त्रास कमी होतो. खोकला येत असल्यास तोंडात खडीसाखर ठेवल्याने दम्याची अथवा खोकल्याची उबळ कमी होते.
७) किडनी स्टोनच्या त्रासावर गुणकारी – किडनीस्टोन अथना मूतखड्याचा त्रास जाणवत असेल तर घरगुती उपचार करण्यासाठी खडीसाखर वापरावी. आयुर्वेदानुसार खडीसाखरेमुळे मूतखडा विरघळून पडतो. यासाठी नियमित कांद्याच्या रसासोबत खडीसाखर घ्या.
८) नवमातांसाठी उत्तम – काळ्या तीळासोबत खडीसाखर खाण्याने महिलांच्या अंगावरील दूध वाढते. यासाठी काळे तीळ वाटून घ्या आणि त्यामध्ये खडीसाखरेची पूड टाका. दररोज नवमातांनी दिवसांतून दोनदा हे मिश्रण कोमट दूधासोबत घ्यावे.
९) दृष्टी सुधार – खडीसाखर खाण्यामुळे तुमची दृष्टी सुधारते. जेवणानंतर किंवा दोन जेवणाच्यामध्ये खडीसाखरेचे पाणी प्यायले तर दृष्टीदोष कमी होतात. शिवाय मोतीबिंदूपासून बचाव होतो. खडीसाखरेचे चांगले फायदे मिळवण्यासाठी खडीसाखरेची पावडर करून वापरा.
१०) तोंडांचे इनफेक्शन कमी होते – खडीसाखरेमुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सतत तोंड येत असेल तर खडीसाखरेचा खडा तोंडात ठेवा. ज्यामुळे हा त्रास कमी होईल. शिवाय तोंड येण्यामुळे होणारी जळजळ आणि दाह देखील कमी होण्यास मदत होईल.
११) मुळव्याधीवर उपचार – खडीसाखर थंड गुणधर्माची आणि वात, पित्त, कफ यांना संतुलित ठेवणारी आहे. पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठता यामुळे मुळव्याधीचा त्रास होतो. मुळव्याधीमुळे पोट आणि गुदद्वाराजवळ दाह होतो. हा दाह कमी करण्यासाठी आणि पित्त नियंत्रित ठेवण्यासाठी मुळव्याधीवर खडीसाखरेचा उपयोग करावा. यासाठी नागकेशरासोबत खडीसाखर घ्यावी.
१२) जुलाब थांबवते – अपचन, दुषित पाणी, चुकीचा आहार अथवा इनफेक्शन यामुळे जुलाबाचा त्रास होऊ शकतो. यासाठी धणे पावडर आणि खडीसाखर एकत्र करून घ्या. ज्यामुळे पोटाला लवकर आराम मिळेल.
१३) घसा मोकळा होतो – घसा खवखवणे अखवा घशाच्या कोणत्याही तक्रारीवर खडीसाखरेचा उपयोग होतो. कारण खडीसाखरेमुळे घसा लवकर स्वच्छ आणि मोकळा होतो. त्यामुळे घशात कोरडेपणा अथवा आवाज बसणे अशा समस्या असतील तर सुंठ आणि खडीसाखरेचे चुर्ण घ्या.
१४) तोंडाचा दुर्गंध कमी होतो – तोंडाला दुर्गंध येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र खडीसाखरेचा वापर मुखवासाप्रमाणे केल्यास चांगला फायदा होतो. बडीसोप आणि खडीसाखर एकत्र करून मुखवास म्हणून वापरावा.
१५) थकवा घालवते – दिवसभर दगदग केली असेल वा फार थकल्यासारखं वाटत असेल, तर खडीसाखरेचा वापर करा. यासाठी प्रवासाला जाताना अथवा खूप दगदग करून घरी आल्यावर खडीसाखरेचा तुकडा तोंडात ठेवा. ज्यामुळे थकवा दूर होतो आणि आराम मिळतो.
१६) मानसिक ताण कमी करण्यासाठी – खडी साखर मेंदूला आराम देण्यासाठी आणि मानसिक थकवा घालवण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी दररोज खडीसाखर आणि अक्रोडची पावडर दूधातून घ्या. ज्यामुळे मानसिक शांतता मिळेल.