ग्रीन टी म्हणजे सर्वोत्तम आरोग्याचा उत्तम पर्याय; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। वाफाळता चहा अनेकांचा वीक पॉईंट असतो. पण कधीकधी हा चहा आरोग्यास हानी पोहचविणाऱ्या पदार्थांपैकी एक ठरतो. त्यामुळे आजकाल दुधाच्या चहापेक्षा ग्रीन ती चा वापर अधिक केला जातो. मुळात ग्रीन-टी हे एक ‘आरोग्यदायी पेय’ म्हणूनक संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. कारण इतर कोणत्याही चहापेक्षा ग्रीन-टीमध्ये अॅंटि ऑक्सिडंट जास्त असतात. ग्रीन – टी ही चहाच्या रोपांवरील अन ऑस्किडाईज पानांपासून तयार करण्यात येते. यात साधारण २०% ते ४५% पॉलिफेनॉल घटक समाविष्ट असतात. शिवाय ६०% ते ८०% एपिगॅलोकॅटेचिन वा EGCG सारखे कॅटेचिन घटकही असतात. केटेचिन हे एक असे अँटी ऑक्सिडंट आहे, ज्यामुळे पेशींचे नुकसान होण्यापासून बचाव होतो.
० ग्रीन- टी’चे फायदे
१) अॅंटीऑक्सिडंटचा योग्य पुरवठा – ग्रीन टीमध्ये भरपूर अॅंटिऑक्सिडंट असतात. ज्यांचा शरीराला प्रचंड फायदा होतो. यामुळे ह्रदयाचे आरोग्य सुधारते. शिवाय रक्तावाटे होणारा ऑक्सिजनचा पुरवठा वाढल्याने पेशींचे पोषण होते. परिणामी ह्रदयरोग होण्याचा धोकादेखील कमी होतो.
२) रक्तदाबावर नियंत्रण – रक्तदाब हा सामान्यपणे मूत्रपिंडातील ACEमुळे होतो. यात ग्रीन – टीचे सेवन केल्याने रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. पर्यायाने रक्तदाब नियंत्रित राहतो.
३) कर्करोगाचा धोका कमी – शरीरामध्ये रोगाच्या पेशी अनियंत्रित प्रमाणात वाढल्यास कर्करोगाचा धोका वाढतो. ग्रीन-टीमध्ये कॅटेचिनसारखे अॅंटिऑक्सिडंट असतात, ज्यामुळे विविध प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव होतो. ग्रीन – टीमधील कॅटेचिन पेशींमधील प्रतिक्रियात्मक ऑक्सिजन प्रजातींमुळे होणा-या DNA चे नुकसान रोखतात.
४) मधुमेह प्रकार २चा धोका कमी – आजकाल मधुमेहींचे प्रमाण फार वाढले आहे. शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास अथवा शरीराने इन्सुलीनच्या निर्मितीचे कार्य थांबविल्यास मधूमेह २ होण्याची शक्यता असते. एका कोरीयन संशोधनानूसार रोज ६ किंवा त्याहुन अधिक ग्रीन-टी प्यायल्याने मधूमेह २ होण्याची शक्यता ३३% कमी होते. मात्र यासाठी किती प्रमाणात ग्रीन-टी घ्यावी यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
६) मेंदूचे कार्य सुधारते – ग्रीन टीमधील कॅफेन मेंदूच्या पेशींना उत्तेजित करते. ज्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते. शिवाय स्मरणशक्ती वाढते. मुड सुधारतो आणि विचार सक्रिय होतात. कॅफेनमुळे अॅडोनोसाईन ही क्रिया बंद होते, ज्यामुळे मेंदूमधील न्यूरो ट्रान्समीटर कार्यात सुधारणा होऊन मेंदूचे कार्य वाढते आणि सुरळीत चालू राहते.
७) आर्थ्राटिसमध्ये आराम – ग्रीन-टी व्हिटॅमिन सी वा ई पेक्षा अधिक प्रभावी आहे. सहाजिकच आर्थ्राटिसमध्ये ग्रीन – टी मधील अॅंटिऑक्सिडंट गुणधर्म अधिक फायदेशीर ठरतात आणि आराम मिळतो.
८) डाऊन सिन्ड्रोमवर उपचार – डाऊन सिन्ड्रोम हा असा आजार आहे, ज्यात एखादी व्यक्ती दोन गुण सुत्रांऐवजी २१ गुण सूत्रांसह जन्माला येते. ज्या लोकांना डाऊन सिन्ड्रोम असतो, त्यांच्यामध्ये काही प्रमाणात शारीरिक किंवा मानसिक अक्षमता असते. संशोधनानूसार ग्रीन – टीमधील ECGG मुळे पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते. ज्यामुळे प्राथमिक स्थितीतील रोगात सुधारणा करणे अतिशय सोपे जाते.
९) रोग प्रतिकारशक्तीत वाढ – ग्रीन टीमधील कॅटेचिन व EGCG मध्ये पेशी वाढविण्याची क्षमता अधिक असते. ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि कोणत्याही विषाणूपासून आपले संरक्षण होते. परिणामी आपण कमी आजारी पडतो.
१०) पचनक्रियेत सुधार – ग्रीन टी पाचक पेय असल्यामुळे त्यातील कॅटेचिन पचनक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे आपण खाल्लेले अन्न पोट व आतड्यांमध्ये अडकून राहत नाही.
११) डिप्रेशनवर फायदेशीर – एका संशोधनानूसार जे लोक दररोज ४ कप ग्रीन-टी पितात त्यांची नैराश्याची समस्या कमी होते. कारण ग्रीन-टीमधील amino acid सेरोटोनिन (हार्मोन्सचा प्रकार) या केमिकलला उत्तेजित करते. परिणामी नैराश्यावर मात करणे सोपे जाते.
१२) दातांच्या समस्येवर परिणामकारक – ग्रीन टी प्यायल्याने दातांमध्ये जंतू संसर्ग कमी होतो. कारण ग्रीन टी मधील पॉलिफेनॉल दातांचे जंतू पासून रक्षण करते. ज्यामुळे दातांचे आरोग्य सुधारते.
१३) वजन कमी करण्यात लाभ – ग्रीन टीमुळे चया पचयाचे कार्य सुधारते यामुळे फॅट्स बर्न होतात. परिणामी वजन आपोआप कमी होते. काही संशोधनानूसार व्यायामासोबत ग्रीन टी घेतल्यास वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. सामान्यपणे पोट कमी करण्यासाठी ग्रीन टी लाभदायक आहे.