|

घरचा वैद्य – आजीबाईचा बटवा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकालच्या बदलत्या जीवन पद्धतीमुळे अनेकांना अनेक विविध आरोग्याशी संबंधित समस्या त्रास देत असतात. दिसताना अगदीच लहान अश्या दिसणाऱ्या या तक्रारी कधी अचानक मोठ्या व्याधींचे स्वरूप धारण करतात हेदेखील कळत नाही. मग काय?? मोठं मोठे डॉक्टर आणि महागड्या गोळ्या औषधांचा अवलंब करून आपण या रोगांवर मात करू पाहतो. पण अनेक लोक आजही लहान दिसणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता त्यासाठी घरगुती उपाय वापरतात.

आजीचा बटवा हे तर तुम्हीही लहानपणी ऐकल असेल. पण हा बटवा काय साधा सुधा नाही. या बटव्यामध्ये अनेको असे उपाय दडले आहेत जे कित्येक रोगांना चुटकीसरशी पळवून लावतात. चला तर जाणून घेऊयात आजीच्या बटव्यातील काही चमत्कारी उपाय. जे देतील आरोग्याशी संबंधित लाभ.

० आजीच्या बटव्यातील खास उपाय:-

१) मळमळ / उल्टीचा त्रास – कधीकधी काहीतरी चुकीचे खाणे किंवा अति खाणे झाल्यास पोटात मळमळ आणि उल्टी सारखे त्रास होतात. यासाठी, एका कांद्याच्या रसात २ लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने पोटात खंगळणे, मळमळणे आणि उलट्या होणे लगेच थांबते व आराम मिळतो.

२) मस्स्यांची समस्या – आपण पाहिले असेल अनेक लोकं मस्स्यांमुळे आपले सौंदर्य गमावू लागतात. यासाठी रामबाण उपाय म्हणून, कांद्याचा रस मस्स्यांवर लावावा. यामुळे ते बारीक होऊन गळून पडतात.

३) दातांची चमक – दातांची काळजी घेणे हे देखील निरोगी आरोग्याची गरज आहे. मात्र कितीही काळजी घेऊन दातांची चमक जाताना दिसते. यासाठी, वाळलेले तमालपत्र बारीक दळून प्रत्येक तिसऱ्या दिवशी एकदा ब्रश केल्याने दात पांढरे शुभ्र होऊन चमकतील.

४) शिंका थांबणे – कधी कधी सलग एका पाठी एक शिंक येऊ लागते. यामुळे कधी कधी नाकाला आतून इजा होऊ शकते. तसेच सर्डीच्या दिवसात शिंका थांबत नसतील तर, ताजी कोथिंबीर चोळून त्याचा वास घ्या. यामुळे शिंका येणं लगेच बंद होते.

५) पोटातील गॅसचा त्रास – चमचमीत जेवण म्हणजे कार्पेट ढेकर आणि गॅसची समस्या १००% होतेच आणि या समस्यांवर आराम मिळवायचा असेल तर, लसणाच्या २ पाकळ्या सोलून २ चमचे साजूक तुपात घोळवून चावून चावून खावे. बघा लगेच आराम मिळेल.

६) झोपेच्या समस्या – अनेकदा ताण, तणाव आणि मानसिक अस्थिरतेमुळे झोप न येण्याची तक्रार जाणवते. किंवा अर्ध्यातून झोप तुटणे अश्या समस्या उद्भवतात. तर, यासाठी रात्री झोपताना तळपायात मोहरीचे तेल लावा आणि झोपा. यामुळे चांगली झोप येते.

७) उचकी – जेवताना घसा कोरडा झाला असेल किंवा घाईगडबडीत घास घेतला तर अन्नातील कण अन्न मालिकेत अडकतात आणि उचकी येऊ लागते ती थांबतच नाही. हा त्रास वारंवार होत असेल तर, १-२ चमचे साजूक तूप गरम करून त्याचे सेवन करा.