तीव्र मसाल्यातील पांढरी मिरी अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपणा सर्वांनाच काळीमिरी माहित आहे. पण पांढरी मिरी माहित आहे का? पांढरी मिरी ही शक्यतो चवीसाठी आणि गरम मसाल्यात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांपैकीच एक पदार्थ आहे. परंतु ही पदार्थांच्या चवीप्रमाणे आरोग्याचीसुध्दा काळजी घेण्यास सक्षम असते. काही लोकं या मिरीला दख्खनी मिरची म्हणून ओळखतात. या मिरीची खासियत म्हणजे तिचे चमत्कारीक गुणधर्म. पांढरी मिरी डोळ्यांसाठी अगदी रामबाण उपाय म्हणून काम करते.
आयुर्वेदात पांढरी मिरी एक औषधी वनस्पती मानली जाते. त्यात फ्लेवोनोइ, जीवनसत्त्वे, लोह आणि बरेच पौष्टिक पदार्थ असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे ज्यांना डोळ्यांच्या समस्या असतील त्या लोकांनी याचे सेवन सुरू केले पाहिजे. मोती बिंदूसारख्या समस्यांसाठी देखील हे उपयुक्त मानले जाते. यासह, पांढरी मिरी शरीराच्या आरोग्याशी संबंधित अनेक सामान्य आजारांपासून ते कर्क रोगापर्यंतच्या गंभीर आणि मोठ्या आजारांपासून आपले रक्षण करण्यास मदत करते. चला तर जाणून घेऊयात पांढरी मिरीचे फायदे.
१) कर्करोगावर नियंत्रण – एका अभ्यासानुसार, कॅप्साइसिन शरीरातील कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकते. त्यामुळे, प्रोस्टेट कर्करोग बरा करण्यासाठी पांढरी मिरी प्रभावी आहे. कारण त्यात जीवनसत्त्वे, लोह, अँटी-ऑक्सिडेंट इ. पौष्टिक पदार्थ मुबलक प्रमाणात आढळतात. म्हणून, दररोज त्याचे सेवन केल्यास शरीरात कर्करोगाच्या पेशी निर्मितीवर प्रतिबंध घालता येतो.
२) निरोगी हृदय – पांढरी मिरी किंवा दख्खनी मिरची खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर पाडण्यासाठी मदत होते. ज्याचा आपल्या हृदयाला अगदी १०० टक्के फायदा होतो. यामुळे पांढऱ्या मिरीचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते. परिणामी हृदयरोग होण्याची शक्यता अतिशय कमी होते.
३) सांधेदुखीपासून अराम – दख्खनी मिरची किंवा पांढरी मिरी यामध्ये असलेले पोषक तत्व आपल्या शारीरिक वेदना आणि थकवा कमी करण्यास लाभदायक असतात. त्यामुळे पांढरी मिरी शरीरात होणाऱ्या वेदनांपासून आराम देण्यात प्रभावी असतात. शिवाय दररोज पांढऱ्या मिरीचे सेवन केल्याने स्नायूंमध्ये सूज आणि सांधेदुखी कमी होते.
४) पोटाच्या समस्यांवर प्रभावी – पोटाशी संबंधित कोणत्याही समस्यांपासून मुक्त होण्यासाठी पांढरी मिरी मदत करते. त्यामुळे तिचा वापर स्वयंपाकामध्ये किंवा कोशिंबीरमध्ये पावडर स्वरूपात करता येतो. शिवाचे पांढऱ्या मिरीचे नियमित सेवन केल्यास पाचन शक्ती देखील बळकट होते आणि पोटदुखी, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, अल्सर सारख्या आजारांमध्ये आराम मिळतो.
५) वजनावर नियंत्रण – पांढऱ्या मिरीचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. कारण या मिरीमध्ये कॅप्साइसिन असते जे अतिरिक्त चरबी बर्न करण्यात मदत करते. यात पांढऱ्या मिरीची काढा प्यायल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते तर वजन नियंत्रणात राहते.