| |

बेकिंग सोड्याचा ‘असा’ वापर कराल तर मिळेल सौंदर्य; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपले सौंदर्य इतरांपेक्षा वरचढ असावे असे नेहमीच सगळ्यांना वाटते. त्यामुळे सौंदर्य टिकवण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण अनेकदा वेगवेगळे प्रयत्न करत असतो. शिवाय त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी बाजारात अनेक सौंदर्य देणारी कित्येक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. पण बेकिंग सोडा त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी फायदेशीर असल्याचे समोर आले आहे. होय. बेकिंग सोडा त्वचेसाठी खूप फायद्याचा आहे. एका संशोधनानुसार, बेकिंग सोडम्युके त्वचेची पीएच लेव्हल संतुलित राहते. परिणामी त्वचेमध्ये चमक आणि ताजेपणा येतो. इतकेच नव्हे तर, चेहऱ्यावरील मुरुमही निघून जातात आणि त्वचा टवटवीत होते.

१) पिंपल्सची समस्या दूर होत.
– चेहऱ्यावर धूळ साचल्याने त्वचा खराब होते. यामुळे तेलकटपणा किंवा कोरडेपणा अशा अनेक समस्या येतात. परिणामी चेहऱ्यावर पिंपल्सही येतात. यावर बेकिंग सोडा उत्तम पर्याय आहे. यासाठी बेकिंग सोडा आणि पाणी एकजीव करून त्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने फरक जाणवतो. बेकिंग सोडा चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करून नवीन थर तयार करतो. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. यासाठी दिवसातून २-३ वेळा ही पेस्ट साधारण ५ मिनिटांसाठी लावावी. मुख्य असे की, ही पेस्ट लावण्याआधी चेहरा स्वच्छ धूवून घ्यावा.

२) ब्लॅकहेड्स निघून जातात.
– बेकिंग सोड्यात अँटी-बॅक्टेरिया आणि अँटी-फंगल गुणधर्म आहे. जे ब्लॅकहेड्स होणाऱ्या बॅक्टेरियाचा नाश करतात. यामुळे ब्लॅक हेड्सची समस्या सहज दूर होते.

३) उष्णतेच्या त्रासावर रोख लावतो.
– बेकिंग सोडा सुर्याच्या उष्णतेला रोखतो आणि त्वचेचे संरक्षण करतो. यामुळे उष्णतेमुळे त्वचेवर येणारी खाज आणि चट्टे येत नाहीत. शिवाय अँटी सेप्टिक गुणधर्मामूळे सूर्यप्रकाशामुळे होणारा अल्सरदेखील बरा करतो. यासाठी बेकिंग सोडा आणि थंड पाण्याची पेस्ट बनवून लावा आणि मग धुवा. याशिवाय बेकिंग सोडा आंघोळीच्या पाण्यात घालूनही अंघोळ केल्यास फायदा होतो. मात्र यानंतर टॉवेलने शरीर पुसताना घासू नये. अगदी हलक्या हाताने मऊ कापडाने शरीर पुसल्यानंतर थोडं हवेत सुकवावे.

० बेकिंग सोड्याचे इतर फायदे

४) बेकिंग सोडा त्वचेवर स्क्रबर सारखा वापरल्याने टॅन काढून टाकण्यास मदत होते.

५) चेहऱ्यावर साचलेली माती काढण्यासाठी लिंबावर बेकिंग सोडा लावून चेहऱ्यावर रब केल्यास फायदा होतो.

६) चेहऱ्यावर पुरळ येणे, खाज सुटणे, लाल चट्टे उमटणे आणि सूज येणे यासाठी बेकिंग सोड्यामध्ये नारळ तेल मिसळा आणि ही पेस्ट ५ मिनिटांसाठी लावा. लगेच परिणाम मिळेल.