|

बेली फॅटचेही असतात विविध प्रकार; माहित नाहीत? मग जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपले वजन वाढू लागले कि आरश्या समोर उभे राहिल्यावर सगळ्यात आधी काही दिसत असेल तर ते आहे आपले पोट. कारण वाढते वजन आपल्या पोटावरील चरबी वाढवते. मग हि अतिरिक्त चरबी आपोआपच बाहेर दिसू लागते. अश्यावेळी सगळेच वाढते वजन कमी करण्यासाठी विविध उपायांचा वापर करतात. मुळात वजन वाढण्यामागे अनेक कारणे असतात. मात्र ती कारणे समजण्याआधी लक्षात येते तो वाढलेला लठ्ठपणा आणि गळणारी अतिरिक्त चरबी. हि वाढणारी चरबी अनेक प्रकारचे रोग वाढविण्याचे कार्य करत असते. त्यात पोटावरील चरबी वाढल्याने अनेक गंभीर समस्या समोर येऊन उभ्या राहतात. कारण पोटावरची चरबी वेगवेगळ्या प्रकारची असते, हे फार कमी लोक जाणतात आणि दुर्लक्ष केल्यामुळे हि बाब पुढे गंभीर होऊ लागते.

१) लो बेली फॅट – एखादी व्यक्त शरीराने जास्त जाड आहे. पण पोट मात्र कमी आहे. अश्या प्रकारच्या फॅटला ‘लो बेली फॅट’ असे म्हणतात.
– याचे प्रमुख कारण असे कि, बदलती जीवनपद्धती आणि चुकीचा आहार. शिवाय अशा व्यक्तीस पोटा संबंधित विविध समस्या असतात.
० यासाठी जास्त फायबरयुक्त पदार्थ खाणे अत्यंत फायदेशीर आहे.
० तसेच जास्त प्रमाणात पाणी पिण्याचाही लाभ होतो.
० या व्यतिरिक्त आहारात हिरव्या पालेभाज्या खाव्यात.
० तर उष्मांक कमी करण्यासाठी दररोज नियमितपणे व्यायाम करावा.

२) स्ट्रेस बेली फॅट – जेव्हा आपल्याला अधिक ताण आणि तणावाचा सामना करावा लागतो. तेव्हा शरीर जास्त दमते आणि स्थूलपेशींमध्ये वाढ होते. परिणामी अधिक प्रमाणात चरबी तयार होऊ लागते.
– स्ट्रेस बेली फॅट प्रामुख्याने तणावामुळेच होते. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात कोर्टिसॉल हार्मोनची वाढ. ज्यामुळे पोटावर सहज आणि वेगाने चरबी जमा होते.
० यासाठी दररोज नित्य नियमाने योगाभ्यास आणि ध्यानधारणा करा.
० दररोज असे केल्याने तणाव आणि नैराश्यातून मुक्त होण्यास मदत होते.

३) हार्मोनल बेली फॅट – हार्मोनल बेली फॅटचा प्रकार अनेको लोकांमध्ये आढळतो. कारण हार्मोनल बेली फॅट हा हार्मोन्सच्या असंतुलनाचा परिणाम आहे.
– हायपोथायरॉईडीझमपासून पीसीओएस पर्यंत शरीरात अनेको हार्मोनल बदल एकापाठोपाठ एक होतात. यामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी दिवसागणिक वाढते.
० यासाठी हार्मोन्स नियंत्रित करणे गरजेचे आहे. म्हणून जीवनशैलीत बदल करा.
० आहारात पाैष्टीक पदार्थांचाच समावेश करा.
० अॅव्होकाडो, शेंगदाणे आणि मासे खा.
० वजन कमी करण्यासाठी दररोज व्यायाम करा.