उत्तम डाएटसाठी काय खाल..? पनीर? का टोफू?; लगेच जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकालची जीवनशैली पाहता अनेकजण आपल्या वजनावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत हे स्पष्ट दिसते. मग अश्यावेळी अनेकांचे वजन कमी करणे हे एकमेव उद्दिष्ट्य असते. पण मग वजन कमी करण्यासाठी काय खावे काय खाऊ नये असा काहीसा प्रश्न समोर येऊन उभा राहतो. मग अंडी, दूध, तूप, हिरव्या पालेभाज्या, काकडी, टोमॅटो अशा वेगवेगळ्या गोष्टींचा डाएटमध्ये समावेश असतो.
मुळात मांसाहारी लोकांना प्रोटीन मिळवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. पण शाकाहारी लोकांच काय? प्रोटीन मिळवण्यासाठी त्यांनी काय खायचं असा मोठा सवाल त्यांना पडतो. त्यामुळे प्रोटीन मिळवण्यासाठी त्यांना दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचे सेवन फायदेशीर असते. यात प्रामुख्याने पनीरचा वापर केला जातो मात्र पनीरमुळे शरीरातील मेद वाढू शकतो. मग अशावेळी उत्तम पर्याय म्हणजे टोफू. म्हणूनच आम्ही तुम्हाला पनीर आणि टोफूतील फरक सांगणार आहोत. शिवाय दोन्हीपैकी उत्तम पर्याय कोणता आणि फायदे काय हे हि सांगणार आहोत. मात्र त्यासाठी हा लेख तुम्हाला पूर्ण वाचावा लागणार आहे.
१) पनीर आणि टोफूमध्ये फरक तरी काय.. ?
० पनीर – फुल फॅट दूधात लिंबू पिळून किंवा सायट्रिक अॅसिड घालून दूध फाडून त्यातून तयार होणारा चोथा वेगळा करुन पाणी काढले जाते. यात जो चोथा किंवा दूधाचा एक गोळा तयार होतो. त्याला पनीर म्हणतात.
पनीर हायप्रोटीन असलेला पदार्थ आहे. याचा वेगवेगळ्या भाज्या, सॅन्डविच आणि ग्रेव्हीमध्ये उपयोग केला जातो.
० टोफू – टोफू सोयाबीन पासून बनवला जातो. यासाठी सोयाबीन भिजत घालून चांगले फुगल्यानंतर शिजवून त्यातून सोया मिल्क काढले जाते. त्यानंतर यात काही गोष्टी मिसळल्याने सोया मिल्कचे घट्ट दह्याच्या गोळ्याप्रमाणे रुपांतर होते. त्याचा उपयोग टोफू म्हणून केला जातो.
याचाही वापर भाज्यांमध्ये केला जातो.
२) आरोग्यासाठी पनीर चांगले का टोफू?
– पनीरमध्ये दुधातील फॅट समाविष्ट असल्यामुळे पनीरचे अति सेवन केल्यामुळे शरीरातील फॅट वाढून वजन वाढण्याची शक्यता असते. तर तुलनेत टोफूमध्ये सोयाबीनपासून बनविल्यामुळे त्यात फॅटचे प्रमाण फार कमी असते. त्यामुळे पनीरच्या तुलनेत टोफुतून अधिक प्रोटीन मिळतात. त्यामूळे एक संपूर्ण प्रोटीन म्हणूनच टोफूची ओळख आहे. शिवाय टोफूमध्ये पोटॅशिअम, कॅल्शिअम, कॉपर, आयर्न आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. ज्याचा आरोग्यास लाभ होतो. मात्र पनीरप्रमाणे टोफूचेही अधिक सेवन करू नये. वजन कमी करण्यासाठी अर्धीवाटी टोफू देखील पुरेसे आहे.
३) टोफू खाण्याचे फायदे –
– तोफूमध्ये सॅच्युरेटेड फॅट असते. त्यामुळे पोट भरते आणि अधिक भूक लागत नाही. परिणामी वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
– महिलांच्या आरोग्यासाठी टोफूचे सेवन चांगले असते. मुख्य म्हणजे, मेनोपॉझच्या दरम्यान होणाऱ्या अनेक त्रासांना टोफू नियंत्रणात ठेवते.
– किडनीचे आजार, डाएबिटीझ यासारख्या आजारांसाठीदेखील टोफूचे सेवन लाभदायक आहे.
*महत्त्वाचे – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानदायीच असतो. त्यामुळे टोफूचे अधिक सेवन करणे देखील त्रासदायी ठरू शकते.